लाहौल - हिमाचल प्रदेश येथे भारतातील पहिली स्नो मॅरेथॉन 26 मार्चला पार पडत ( Lahaul Spiti Snow Marathon ) आहे. लाहौल येथे ही मॅरेथॉन होणार आहे. रिच इंडिया संस्था आणि गोल्ड ड्रॉप अॅडव्हेंचर लाहौल स्पिती प्रशासनाने या सर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत 100 स्पर्धक भाग घेतील, अशी माहिती स्नो मॅरथॉनच्या आयोजकांनी दिली आहे.
आयोजकांनी सांगितले की, जगभरात आर्कटिक सर्कल, उत्तरी ध्रुव आणि सायबेरिया येथील बर्फाच्छिद प्रदेशात स्नो मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यंदा भारतात पहिल्यांदा स्नो मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय सैन्याचे 10 आणि नेव्हीचे 10 सदस्य सहभागी होतील. त्याशिवाय दिल्ली, हरयाणा, पंजाब, तामिळनाडू, केरळ आणि सिक्कीम येथून स्पर्धक सहभागी होणार आहेत. 42, 21 आणि 10 किलोमीटर असे स्पर्धेचे स्वरुप असेल, अशी माहितीही आयोजकांनी दिली आहे.
लाहौल स्पितीचे उपायुक्त नीरज कुमार म्हणाले की, 26 मार्च रोजी रिच इंडिया संस्था आणि गोल्ड ड्रॉप अॅडव्हेंचर लाहौल स्पिती प्रशासनाच्या सहकार्याने स्नो मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. लाहौल स्नो फेस्टिवल सोबत, क्रीडा आणि पर्यटनाबाबत आपली प्रतिमा जगासमोर नेण्यास मदत करेल. ही स्नो मॅरेथॉन देशात एका नवीन खेळाला जन्म देईल, असेही कुमार यांनी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - धक्कादायक व्हिडिओ..! दैव बलवत्तर, सायकल बसखाली चिरडली पण तो बचावला...