ETV Bharat / bharat

कोरोना कमी होतोय ! नव्या 62,224 रुग्णांची नोंद, 2,542 बळी

author img

By

Published : Jun 16, 2021, 11:50 AM IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची एकूण 62,224 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. पण या काळात कोरोना संसर्गामुळे 2,542 लोकांचा मृत्यूही झाला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची एकूण 62,224 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. पण या काळात कोरोना संसर्गामुळे 2,542 लोकांचा मृत्यूही झाला आहे.

कोरोनामधून बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. गेल्या 24 तासात देशभरात 1,07,628 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2,83,88,100 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे देशातील कोरोना रिकव्हरीचा दर वाढून 95.80% झाला आहे.

देशातील कोरोनाची स्थिती...

  • एकूण कोरोना रुग्णांचा आकडा : 2,96,33,105
  • कोरोनामुक्त रूग्ण : 2,83,88,100
  • मृत्यू झालेल्याची संख्या : 3,79,573
  • सक्रीय रुग्ण संख्या : 8,65,432
  • एकूण लसीकरण : 26,19,72,014 (गेल्या 24 तासांत 28,00,458 )

नवीन रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. पण मृतांचा आकडा वाढत असून घाबरवणारा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, यूपीत करोना मृत्युंची संख्या अधिक आहे.

कोरोनाचा 'डेल्टा प्लस' स्ट्रेन घातक -

कोरोना विषाणू हा वारंवार आपले रुप बदलताना दिसून येत आहे. आधी आफ्रिका, मग लंडन आणि अशाच काही देशांनंतर भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत. भारतातील या स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावं देण्यात आली होती. यामधील डेल्टा स्ट्रेनचा 'डेल्टा प्लस' हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा या व्हेरिएंटवर कितपत परिणाम होतो याबाबतही साशंकता असल्याचे डॉ. शीतल वर्मा यांनी म्हटले आहे. त्या केजीएमयूमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाने ४७ वेळा बदलले रुप...

महाराष्ट्रात केलेल्या संशोधनानुसार, तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची वेगवेगळी रुपं पहायला मिळाली. प्लाझ्मा, रेमडेसिवीर आणि स्टेरॉईडयुक्त औषधांच्या अतीवापरामुळे कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात म्युटेशन झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. यामुळेच दुसऱ्या राज्यांमध्येही सीक्वेन्सिंग करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), आयसीएमआर आणि दिल्लीतील एनसीडीसी यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.