ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46 हजार रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 96.80 वर - देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

गेल्या 24 तासांत 46,148 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 979 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 58,578 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 28, 2021, 1:57 PM IST

नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही वाढत असल्याचे दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातच भारतात गेल्या 24 तासांत 46,148 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 979 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 58,578 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...

  • एकूण रुग्ण : 3,02,79,331
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,93,09,607
  • सक्रिय रुग्ण संख्या : 5,72,994
  • एकूण मृत्यू : 3,96,730
  • एकूण लसीकरण: 32,36,63,297

कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या सुमारे तीन लाखांच्या पुढे गेली आहे. तर देशातील रिकव्हरी रेट 96.80 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर हा 1.31 आणि सक्रिय रुग्णांचा दर 1.89 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 17,21,268 हजार जणांना लस टोचवण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 32,36,63,297जणांचे लसीकरण झाले आहे.

देशात तिसऱ्या लाटेची शक्यता -

जगात कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. यातच आता तिसऱ्या लाट पसरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हॅरिएंटबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा अनेक राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. डेल्टा प्लसमुळे देशात रुग्णाचा पहिला मृत्यू हा मध्य प्रदेशमध्ये झाला आहे. येत्या सहा ते आठ आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी दिला आहे. विषाणूचे रूप कधी बदलेल हे कोणालाही ठाऊक नसते, याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. परंतु जगात असे बरेच देश आहेत. जिथे दुसरी किंवा चौथी लाट आली नाही. सावधगिरी बाळगल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर विजय मिळवता येईल.

हेही वाचा - #MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.