ETV Bharat / bharat

Independence Day : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू: दिल्लीत जवानांची कवायत, काश्मीरमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन - दिल्लीत कडक बंदोबस्त

देशाच्या स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी लाल किल्ल्यात सुरू आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात येणाऱ्या कवायतीची भारतीय सैन्यदलाच्या सशस्त्र तुकड्यांनी कवायती केल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्वाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Indias 77th Independence Day
दिल्लीत लष्करी जवानांची कवायत
author img

By

Published : Aug 13, 2023, 11:02 AM IST

Updated : Aug 13, 2023, 11:11 AM IST

नवी दिल्ली : देशभरात 77 वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिल्लीत लष्कराच्या सशस्त्र दलांनी कवायत सुरू केली आहे. यात लष्करी बँड पथक, नौदल आणि हवाई दलाने सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'मेरी माटी मेरा देश'चा देशभरात नारा : केंद्र सरकारच्या वतीने या वर्षी 'मेरी माटी मेरा देश' ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत जम्मू काश्मीरमध्ये नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या नेतृत्वात 'हर घर तिरंगा' ही रॅली काढण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीच्या निमित्ताने नागरिकांमध्ये शांतीचा संदेश देण्यात येत आहे. काश्मीर पोलिसांनी या रॅलीत अधिकाधिक नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

  • #WATCH | Delhi: On invitation as a special guest on Independence Day celebrations at Red Fort, Senior Nursing Officer Sonia Chauhan says, "It is a matter of pride & honour as a senior Nursing Officer that I have been invited as one of the special invitees on the occassion of 15th… pic.twitter.com/cxknAKiQPd

    — ANI (@ANI) August 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लाल किल्ल्यावर नर्सिंग अधिकाऱ्यांना पाचारण : देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 नर्सिंग अधिकाऱ्यांना लाल किल्ल्यावर होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात पाचारण केले आहे. देशातील रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सिंगच्या अधिकाऱ्यांना लाल किल्ल्यावर पाचारण केल्यामुळे या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहे. नर्सिंगकडे कोणी लक्ष देत नसल्याची नागरिकांची भावना होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात बोलावल्याने ही भावना मागे पडली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत असल्याचे जावेद मोहमद यांनी सांगितले आहे.

  • #WATCH | Kashmir: J&K Lieutenant Governor Manoj Sinha flags off Tiranga Rally from SKICC to Botanical Garden on the banks of dal lake to celebrate ‘Azadi Ka Amrit Mahotsav’ ahead of Independence Day. pic.twitter.com/GPEqgorE8C

    — ANI (@ANI) August 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लाल किल्ल्यावर यावर्षी 18 पाहुणे : भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव लाल किल्ल्यावर साजरा करण्यात येतो. देशभरातील नागरिकांना लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या भाषणांची उत्सुकता लागलेली असते. यावर्षी भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या समारंभाला तब्बल 1 हजार 800 पाहुणे निमंत्रित करण्यात आली आहेत. स्थानिक संस्था प्रतिनिधी, शेतकरी, सरपंच, शिक्षक, मच्छीमार आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पाहुण्यांमध्य समावेश आहे.

Last Updated : Aug 13, 2023, 11:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.