कोलंबो (श्रीलंका) IND vs SL Asia Cup 2023 Final : आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेविरूद्ध 10 गडी राखून विजय संपादन केलाय आहे. या समान्यात सर्वात चांगली कामगिरी भारताच्या मोहम्मद सिराजनं केलीय. त्यांनं एकाच षटकात चार विकेट घेत, श्रीलंकनं संघाला चितपट केलंय. सिराजनं त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 6 विकेटसह 21 धावा काढून श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज कामगिरी केलीय. यावर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं म्हणाला की, हे त्याच्यासाठी स्वप्नासारखं आहे.
-
4 wickets in his second over! This is absolute mayhem! 😱#AsiaCup2023 #INDvSL pic.twitter.com/yJ0r1FXVxS
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">4 wickets in his second over! This is absolute mayhem! 😱#AsiaCup2023 #INDvSL pic.twitter.com/yJ0r1FXVxS
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 17, 20234 wickets in his second over! This is absolute mayhem! 😱#AsiaCup2023 #INDvSL pic.twitter.com/yJ0r1FXVxS
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 17, 2023
50 धावांवर डाव गुंडाळावा : सिराजच्या वेगवान गोलंदाजीमुळंच श्रीलंकनं संघाला 50 धावांवर डाव गुंडाळावा लागला. सिराजनं एका षटकात चार विकेट घेतल्या. त्याला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्यानं देखील चांगली साथ दिली. "(हे) मला स्वप्नासारखं वाटतं. मागच्या वेळी मी, त्रिवेंद्रम इथं श्रीलंकेविरुद्ध असंच केलं होतं. चार विकेट मिळाल्या, मात्र त्यावेळी मला पाच विकेट मिळवता आल्या नाहीत.
1 षटकात घेतले 4 बळी : मोहम्मद सिराजसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः नाग्या टाकल्या. श्रीलंकेच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी सिराज भारताकडून आला, तेव्हा षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं 2 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्यांनं पथुम निसांकाला रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद केलं. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिराजनं सदिरा समरविक्रमाला शून्य धावसंख्येवर एलबीडब्ल्यू केलं. सिराज इथंच थांबला नाही, तर त्यानं चौथ्या चेंडूवरच चरिथ असलंकाला (0)वर इशान किशनकरवीकडं झेलबाद केलं. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर त्यानं 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर धनंजय डी सिल्वाला केएल राहुलकडं झेलबाद केलं.
1 षटकात 4 बळी घेणारा पहिला गोलंदाज : सिराजनं तिसऱ्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला शून्य धावांवर क्लीन बोल्ड करत त्याची 5वी विकेट घेतली. मोहम्मद सिराज आशिया चषकाच्या इतिहासात 1 षटकात 4 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सिराजच्या कारकिर्दीतील या पहिल्याच पाच विकेट आहेत. सिराजनं शानदार गोलंदाजी करत 6 बळी घेतले आहेत.
हेही वाचा -