- मिनी लॉकडाऊनचा आज तिसरा दिवस
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे राज्यात कडक निर्बंध अर्थात मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. या मिनी लॉकडाऊनचा आज तिसरा दिवस आहे. कोरोना संदर्भातले अनेक नियम कडक केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
- मुंबई महापालिकेची स्थायी समितीची सभा
मुंबई - मुंबई महापालिकेची स्थायी समितीची सभा आज होणार आहे. या सभेत अनेक विषय, प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्यावर सविस्तर चर्चा होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत.
- सीबीआयचे पथक मुंबईत
मुंबई - सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाकडून आज परमबीर सिंग, जयश्री पाटील यांची एकामागून एक जबानी घेतली जाणार असल्याची शक्यता आहे.
- NIA न्यायालयात सचिन वाझेला हजर करणार
मुंबई - सचिन वाझेची एनआयए कोठडी आज संपत आहे. त्यामुळे वाझेला न्यायालयात आणण्यात येणार आहे. अँटिलिया कार स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेला एनआयएने अटक केली होती.
- पंतप्रधान मोदींची आज विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत 'परीक्षा पे चर्चा'
नवी दिल्ली - परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत 'परीक्षा पे चर्चा' करणार आहेत. व्हर्चुअल पद्धतीने पंतप्रधान मोदी हे देशातील विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.
- अमित शाह आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर
नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह हे आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. अमित शाह हे आज सिंगूर, डोमजूर, बेहाला पूर्ब येथे रोड शो करणार आहेत.
- दिल्ली, गुजरातमध्ये नाईट कर्फ्यू लागू
नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच मृत्यूदरही वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. नवी दिल्ली आणि गुजरातमध्ये 30 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- मुख्तार अन्सारीला आज बांदा तुरुंगात हलवणार
लखनऊ - गुंड मुख्तार अन्सारीला उत्तर प्रदेशमध्ये परत आणण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक पंजाबला मंगळवारी पोहोचले होते. बांदा पोलिसांचे पथक आज मुख्तारला रोपड तुरुंगातून बांदा तुरुंगात आणणार आहेत.