ETV Bharat / bharat

Electric Racing Car : IIT मद्रासच्या विद्यार्थ्यांनी लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक रेसिंग कार - टीम रफ्तार

टीम रफ्तारचे (IIT Madras team Raftar) जगातील सर्वोत्तम फॉर्म्युला स्टुडंट टीम बनण्याचे उद्दिष्ट आहे. भारतातील फॉर्म्युला संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. यामध्ये सतत नवनवीनता आणि तांत्रिक प्रगती केंद्रस्थानी आहे. (First electric racing car).

Electric Racing Car
Electric Racing Car
author img

By

Published : Nov 28, 2022, 8:59 PM IST

चेन्नई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT मद्रास) च्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पहिली इलेक्ट्रिक फॉर्म्युला रेसिंग कार लॉन्च केली. टीम रफ्तारच्या (IIT Madras team Raftar) विद्यार्थ्यांनी पूर्णपणे तयार केलेली फॉर्म्युला कार ‘RF23’ ही एका वर्षाच्या मेहनतीचा परिणाम आहे. टीमने डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगची चाचणी केली. इलेक्ट्रिक ड्राइव्हद्वारे वितरीत केलेल्या उच्च उर्जेमुळे पूर्वीच्या अंतर्गत ज्वलन इंजिन मॉडेलच्या तुलनेत वेग आणि लॅप वेळामध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे. (First electric racing car).

Electric Racing Car
इलेक्ट्रिक रेसिंग कार

टीम रफ्तारने बनवली रेसिंग कार : टीम रफ्तारचे जगातील सर्वोत्तम फॉर्म्युला स्टुडंट टीम बनण्याचे उद्दिष्ट आहे. भारतातील फॉर्म्युला संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. यामध्ये सतत नवनवीनता आणि तांत्रिक प्रगती केंद्रस्थानी आहे. रफ्तार टीम जगभरातील टॉप इंजिनीअरिंग कॉलेजेस विरुद् फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी दरवर्षी उच्च-कार्यक्षमता असलेल्या रेस कारचे डिझाइन, बिल्डिंग आणि रेसिंग करण्यात माहिर आहे. टीम रफ्तार IIT मद्रास येथील सेंटर फॉर इनोव्हेशन (CFI) च्या स्पर्धा संघांपैकी एक आहे. यामध्ये ४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उद्योग-मानक अभियांत्रिकी पद्धतींना चालना देण्यासाठी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये वास्तविक जागतिक तांत्रिक कौशल्य वाढवण्यास उत्सुक आहे.

रफ्तार एक व्यासपीठ बनेल : 'RFR 23' चे अनावरण केल्यानंतर लाँच इव्हेंटला संबोधित करताना IIT मद्रासचे संचालक प्रो. व्ही. कामकोटी म्हणाले, "जागतिक प्रवृत्तीच्या अनुषंगाने इंघनातून इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे आवश्यक आहे. जागतिक इलेक्ट्रिक वाहन उद्योग अजूनही त्याच्या नवोदित अवस्थेत आहे. या क्षेत्रात वाढ आणि तांत्रिक प्रगतीची क्षमता प्रचंड आहे.” विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना टीम रफ्तारचे फॅकल्टी अॅडव्हायझर प्रा. सत्यनारायणन शेषाद्री म्हणाले, “रफ्तार लवकरच ड्रायव्हरलेस कार आणि कनेक्टेड मोबिलिटी तंत्रज्ञान यासारख्या भविष्यातील नवकल्पना तयार करण्यासाठी एक व्यासपीठ बनेल. ‘RFR 23’ गेल्या वर्षभरात संघाच्या प्रत्येक सदस्याने घेतलेले अविरत तास आणि प्रयत्नांचे प्रदर्शन करते. ही कार टीमने दाखवलेल्या संशोधन, नवकल्पना आणि चिकाटीचा कळस आहे.”

रफ्तारचे उद्दिष्ट : जानेवारी 2023 मध्ये कोईम्बतूर येथील कारी मोटर स्पीडवे येथे होणार्‍या फॉर्म्युला भारत कार्यक्रमात ही टीम सहभागी होणार आहे. 2023 च्या ऑगस्टमध्ये या कारला जगातील सर्वात प्रतिष्ठित फॉर्म्युला स्टुडंट इव्हेंटमध्ये फॉर्म्युला स्टुडंट जर्मनीमध्ये पोडियमवर स्थान मिळवण्यासाठी जगभरातील सर्वोत्कृष्ट संघांसमोर उभे राहण्याचे ध्येय आहे. त्यांच्या प्रमुख उद्दिष्टांबद्दल स्पष्टीकरण देताना टीम रफ्तारच्या विद्यार्थी संघाचे कॅप्टन श्री कार्तिक करुमांची म्हणाले, “आमचे प्राथमिक लक्ष सुरक्षित, टिकाऊ आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक वाहन तयार करणे आहे. उद्योगात सध्या भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेऊन त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय योजण्याचा प्रयत्न करून आम्ही हे उद्दिष्ट गाठले. आम्ही बॅटरीचे योग्य थर्मल व्यवस्थापन, एक मजबूत डेटा लॉगिंग आणि व्हिज्युअलायझेशन इंटरफेस आणि बॅटरी पॅकसाठी अत्यंत अचूक स्टेट-ऑफ-चार्ज एस्टिमेटरची गरज ओळखली. या समस्यांवर उपाय शोधण्यावर आणि त्यांना ‘RFR 23’ मध्ये समाविष्ट करण्यावर आम्ही आमचे प्रकल्प आधारित आहेत.”

ऑटोनॉमस ड्रायव्हिंग : टीम रफ्तार 2025 पर्यंत आपली पहिली ड्रायव्हरलेस रेस कार विकसित करण्याच्या आणि फॉर्म्युला स्टुडंट इव्हेंटच्या 'ड्रायव्हरलेस श्रेणी'मध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहे. फॉर्म्युला स्टुडंट हे तंत्रज्ञान विकसित आणि परिपूर्ण करण्यासाठी आदर्श चाचणी मैदान प्रदान करतो. विद्यार्थी भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे प्रोसेसर SHAKTI अंतर्भूत करण्याच्या प्रक्रियेत आहेत जेणेकरून कोणत्याही बाह्य अवलंबनाशिवाय संपूर्ण सानुकूलता प्राप्त होईल. क्लाउड स्टोरेज आणि प्रक्रिया करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे ईव्हीचे डीव्हीमध्ये निर्बाध रूपांतर होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.