जयपूर- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात आयएएस टीना डाबीचे लग्न ( IAS Tina Dabi Grand Marriage ) चर्चेत आहे. आज डाबी या मराठमोळे आयएएस अधिकारी डॉ. प्रदीप गावंडे यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांचे लग्न जयपूरमध्ये होणार आहे.
आयएएस अधिकारी डॉ. प्रदीप गावंडे व टीना डाबी यांच्या लग्नात खास नातेवाईक आणि मित्र सहभागी होणार आहेत. राजस्थानात कार्यरत असलेले आयएएस डाबी आणि गावंडे यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना लग्नासाठी निमंत्रित केल्याची बातमी आहे. या विवाहाला मुख्यमंत्री अशोक गेहलोतही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येत्या 22 एप्रिल रोजी हे जोडपे भव्य रिसेप्शन ( Dabi Grand Marriage In Jaipur ) देणार आहेत. यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.
रिसेप्शन हॉटेल हॉलिडे इन मध्ये होणार- लग्नाची घोषणा होताच काही दिवसांतच डाबी यांनी सोशल प्लॅटफॉर्मचे अकाउंट बंद केली आहेत. मात्र, त्याच दरम्यान त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीची चर्चा सुरुच राहिली आहे. 22 एप्रिल रोजी डाबी- गावंडे जोडप्याचे रिसेप्शन हॉटेल हॉलिडे इन येथे होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक पाहुणे हजर राहणार आहेत. यामध्ये सरकारी अधिकारी, उच्च पोलीस अधिकाऱ्यांसह काही राजकीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.
दुसऱ्या लग्नाची चर्चा - टीना डाबी यांचे पहिले लग्न बॅचमेट अतहर (tina Dabi Remarriage) खानसोबत झाले होते. त्यावेळी हिंदू मुस्लिम चालीरीतींवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यांना खूप ट्रोल करण्यात आले. धर्मांतराबाबतही बरेच प्रश्न विचारण्यात आले. यावेळीही टीना डाबी यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, यावेळी दोघांच्याही धर्माचा विवाहात अडसर नाही. हे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने होणार की दोघेही कोर्ट मॅरेज करणार, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.
माध्यमांत डाबी यांची असते नेहमीच चर्चा- आयएएस टीना डाबी केवळ लग्नामुळेच चर्चेत राहिल्या नाहीत. याआधीही त्या सोशल मीडियावर चर्चेत राहिल्या आहेत. 2016 च्या बॅचच्या IAS टॉपरला 'फर्स्ट दलित टॉपर' असा टॅग देण्यात आला. त्यानंतर त्या बॅचमेटसोबतच्या लग्नामुळे चर्चेत राहिली. यानंतर, 2018 मध्ये त्यांना घटस्फोटाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्या नियमितपणे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असल्याने लाखो फॉलोअर्स होते.
हेही वाचा-UPSC टाॅपर टीना डाबी घेणार मराठमोळ्या प्रदीप गावंडेंसोबत 7 फेरे, जाणून घ्या कोण आहेत प्रदीप
हेही वाचा-आयएएस टॉपर टीना दाबीचा ग्लॅमरस लूक, सौंदर्यात कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही