ETV Bharat / bharat

तेलंगणात हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, 2 वैमानिकांचा मृत्यू - संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

IAF aircraft accident in Telangana : हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झालाय. या अपघातावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलंय.

IAF aircraft accident in Telangana
IAF aircraft accident in Telangana
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 11:43 AM IST

Updated : Dec 4, 2023, 1:23 PM IST

दिंडीगुल IAF aircraft accident in Telangana : तेलंगणातील दिंडीगुल इथं आयएएफचं पिलाटस ट्रेनर विमान कोसळलंय. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हैदराबादहून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना आज सकाळी Pilatus PC 7 Mk II हे विमान कोसळलं. विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचं भारतीय हवाई दलानं सांगितलंय. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

दोन वैमानिकांचा मृत्यू : अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वैमानिकांपैकी एक प्रशिक्षक होता, तर दुसरा हवाई दलातील प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. Pilatus PC7 Mk 2 हे विमान सकाळी वायुसेना अकादमीतून नियमित प्रशिक्षणासाठी निघालं होतं. पण, वाटेत विमानाचा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानातील दोन्ही पायलटचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर काही मिनिटांतच विमान जळून खाक झालं. Pilatus PC7 Mk 2 हे एक लहान विमान आहे. हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्या येते.

  • #WATCH | A Pilatus PC 7 Mk II aircraft met with an accident today morning during a routine training sortie from AFA, Hyderabad. Both pilots onboard the aircraft sustained fatal injuries. No damage to any civil life or property has been reported: Indian Air Force officials https://t.co/EbRlfdILfg pic.twitter.com/Eu65ldloo6

    — ANI (@ANI) December 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रक्षा मंत्र्यांकडून दुःख व्यक्त : हैदराबादमध्ये झालेल्या विमान अपघातावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केलाय. राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पुर्वीचं ट्विटर) वर लिहिलं की, 'हैदराबादजवळ झालेल्या अपघाताची बातमी कळून दुःख झालं. दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला हे अत्यंत दुःखद आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझी संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे.'

  • Anguished by this accident near Hyderabad. It is deeply saddening that two pilots have lost their lives. In this tragic hour, my thoughts are with the bereaved families. https://t.co/K9RljlGu0i

    — Rajnath Singh (@rajnathsingh) December 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गेल्या आठ महिन्यांतील तिसरा विमान अपघात : भारतीय हवाई दलाचा गेल्या आठ महिन्यांतील हा तिसरा विमान अपघात आहे. याआधी जूनमध्ये कर्नाटकातील चामराजनगरमध्ये आयएएफचं किरण ट्रेनर विमान कोसळलं होतं. मात्र, यावेळी जेटमध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटचा वापर करून त्यांचे प्राण वाचवले. तर मे महिन्यात भारतीय लढाऊ विमान मिग-21 राजस्थानच्या हनुमानगडमध्ये कोसळलं होतं.

हेही वाचा :

  1. Training Aircraft Crashed : बारामतीजवळ प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं; एकजण जखमी
  2. MIG 21 aircraft crash : राजस्थानमध्ये मिग २१ विमान कोसळले, दोन महिलांचा मृत्यू, वैमानिक सुरक्षित

Last Updated : Dec 4, 2023, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.