ETV Bharat / bharat

Jharkhand Crime News : मेहुणीशी एकतर्फी प्रेम..पतीने दारुच्या नशेत केली पत्नीची हत्या!

झारखंडच्या धनबादमध्ये एका पतीने मेहुणीच्या एकतर्फी प्रेमातून पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला, मात्र चार दिवसांनंतर त्याला पोलिसांनी पकडले. वाचा संपूर्ण बातमी..

Jharkhand Crime News
झारखंडच्या धनबादमध्ये पत्नीची हत्या
author img

By

Published : Jan 12, 2023, 9:57 PM IST

डीएसपी अरविंद कुमार बिन्हा

धनबाद (झारखंड) : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील महावीर नगर येथे राहणारा अनिल डोम आपल्या मेहुणीवर एकतर्फी प्रेम करत असे. त्याला आपल्या मेहुणीला पत्नीसह एकाच घरात ठेवायचे होते. मात्र त्याच्या पत्नी आणि घरातील सदस्यांना या गोष्टी आवडत नव्हत्या. यासाठी घरचे लोक अनिलला अनेकदा मनाई करायचे. त्यामुळे मेव्हणीचे प्रेम मिळवण्यासाठी अनिल डोमने पत्नीला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. 8 जानेवारीला त्याने पत्नीला घराबाहेर ओढून रस्त्यावर आणले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. बचावासाठी गेलेल्या मेहुणीला आणि सासूलाही त्याने चाकूने वार करून जखमी केले.

उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू : कायदा आणि सुव्यवस्था डीएसपी अरविंद कुमार बिन्हा यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देताना सांगितले की, 8 जानेवारी रोजी धनसार पोलीस स्टेशन परिसरातील महावीर नगर येथे राहणाऱ्या अनिल डोम याने त्याची पत्नी अंजली देवी हिला घरातून ओढून नेले. त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेत त्याची मेहुणी दिव्या आणि सासू गीता देवी याही जखमी झाल्या आहेत. सर्वांना उपचारासाठी एसएनएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे उपचारादरम्यान पत्नी अंजली देवी हिचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Jharkhand Crime News : महिलेवर घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न..विरोध केल्यानंतर दिले पेटवून

आरोपीची दारूच्या नशेत असल्याची कबुली : घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी पती अनिल डोम हा तेथून फरार झाला. पोलिसांनी आरोपी पतीला गुरुवारी अटक केली. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे. अनिलने पोलिसांसमोर आपला गुन्हा मान्य केला आहे. मेहुणीसोबत एकतर्फी प्रेमसंबंध असल्याने पत्नीची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला आपल्या मेहुणीला सोबत ठेवायचे होते. ज्याला घरातील लोक विरोध करत असत. घटनेच्या दिवशी तो दारूच्या नशेत होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. केवळ मेहुणीचे प्रेम मिळवण्यासाठी त्याने पत्नीची हत्या केली आहे.

हेही वाचा : Jharkhand Crime News : नवरा म्हणाला बाजारात नको जाऊ..रागाच्या भरात बायकोने केले असे काही..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.