मेष - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र व कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ व नियोजन करू शकतील. आपल्या हातून लोकहिताचे एखादे काम होईल.
वृषभ - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद - विवाद ह्यात यशस्वी व्हाल. वाचन - लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कष्टाचे पूर्ण चीज झाले नाही तरी आपण पुढेच जात राहाल. पचनक्रियेची समस्या उदभवुन प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
मिथुन - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका.
कर्क - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसह पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी- व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
सिंह - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्या लोकांचे निरोप येतील व व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्र - मैत्रिणी सुद्धा मदत करतील. डोळे व दातांच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आज आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल. कार्यात यश मिळवू शकाल.
कन्या - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जीवन साथीचा सहवास व सहल - प्रवास ह्यामुळे आपला दिवस आनंदात जाईल.
तूळ - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. नातलगांचे गैरसमज होतील.
वृश्चिक - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रां बरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही किंवा मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.
धनू - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मान - सन्मान होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील.
मकर - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरास थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही.
कुंभ - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज अनेक विध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. चोरी, अवैध काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरेल. खर्च वाढल्यामुळे हात आखडता घ्यावा लागेल. मन शांत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
मीन - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पडल्याने दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह मेजवानी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. यश व प्रसिद्धी वाढेल.
हेही वाचा - Bhaskar Jadhav Farming : शिवसेनेचे आक्रमक भास्कर जाधव रमले लागवडीच्या कामात; पाहा त्यांचा भलरीचा Video