आगरतळा (त्रिपुरा): Amit shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी उत्तर त्रिपुरा आणि दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यात Home Minister Amit shah visits Tripura भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करतील. ताज्या माहितीनुसार शाह काही वेळापूर्वीच आगरतळा येथे पोहोचले. सीएम माणिक साहा यांनी त्यांचे स्वागत केले. Tripura BJPs Rath Yatras
भाजपच्या त्रिपुरा युनिटचे अध्यक्ष राजीव भट्टाचार्जी यांनी सांगितले की, ते पक्षाची पहिली रथयात्रा सुरू करण्यासाठी आणि एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी उत्तर त्रिपुरातील धर्मनगरला रवाना होतील. भट्टाचार्जी यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर ते दक्षिण त्रिपुरातील सबरूम येथे जाऊन दुसऱ्या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवतील आणि दुसऱ्या जाहीर सभेला संबोधित करतील. शाह गुरुवारी संध्याकाळी त्रिपुराहून दिल्लीला रवाना होतील.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी Tripura Assembly Elections 2023 राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी 'जनविश्वास यात्रा' सर्व 60 मतदारसंघांतून 1,000 किलोमीटरचे अंतर पार करेल, असे भट्टाचार्य म्हणाले. 12 जानेवारीला यात्रेची सांगता होणार असून त्याअंतर्गत एकूण 100 रॅली आणि रोड शोचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भट्टाचार्जी यांच्या मते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शेवटच्या दिवशी यात्रेत सामील होतील. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, आगरतळा येथे दाट धुके आणि खराब दृश्यमानतेमुळे शाह यांचे विमान बुधवारी रात्री महाराजा बीर बिक्रम विमानतळावर उतरू शकले नाही. गुवाहाटीतील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे विमान वळवावे लागले, असे त्यांनी सांगितले होते.
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी राज्यात भाजपच्या जनविश्वास यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. राज्यातील दोन ठिकाणांहून या प्रवासाला सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य समितीने दहा दिग्गज नेत्यांना प्रचारक म्हणून यात्रेत सामील होण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतीय जनता पक्ष पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी त्रिपुरा राज्यात जनविश्वास यात्रा काढत आहे.
याची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत. उत्तर त्रिपुरामध्ये सुरू होणारी जनविश्वास यात्रा शाह यांच्या उपस्थितीत धर्मनगर येथून सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. दुसरीकडे, दक्षिण त्रिपुरातून सुरू होणाऱ्या रथयात्रेला दुपारी २.३० वाजता अमित शहा सबरूम येथून हिरवा झेंडा दाखवतील. विशेष म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे, पण भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याची कमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. अमित शाह जानेवारी महिन्यातच 11 राज्यांचा दौरा करणार आहेत.