ETV Bharat / bharat

Home Guard Raped RTA Employee: होमगार्डचा परिवहन कर्मचारी महिलेवर बलात्कार, 4 वर्षे अत्याचार करुन 50 लाखांची मागणी - tortured for 4 years

हैदराबादमधील एका परिवहन कर्मचाऱ्यावर त्याच विभागातील एका होमगार्डने बलात्कार केला (Home Guard Raped RTA Employee). तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ तयार केले. त्याने तिच्यावर धमकी देऊन चार वर्षे अत्याचार केले. शेवटी तिने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर या नराधमाला अटक करण्यात आली.

होमगार्डचा परिवहन कर्मचारी महिलेवर बलात्कार

author img

By

Published : Jul 26, 2022, 10:17 AM IST

हैदराबाद: परिवहन विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करणाऱ्या त्याच विभागाच्या होमगार्डला गजाआड करण्यात आले आहे (Home Guard Raped RTA Employee). चार वर्षांपूर्वी त्याने तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ बनवला आणि तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतरही अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि पैसे घेतले. शेवटी सहन न झालेल्या पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांनी सोमवारी रात्री आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील परिवहन विभागाच्या कार्यालयात काम करणारी एक वरिष्ठ कर्मचारी पतीपासून विभक्त झाली होती. तिला दोन मुले आहेत. या कर्मचाऱ्याची 2018 मध्ये खम्मम येथील परिवहन विभागाच्या कार्यालयात उच्च अधिकाऱ्यांनी बदली केली होती.

रक्षकच भक्षक - आई व मुले तेथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले स्वामी भेटले. त्यांनी त्यांना घर दाखवले आणि मुलांना शाळेत दाखल केले. काही दिवसांतच तो कुटुंबाचा एकप्रकारे रक्षणकर्कता बनला. त्यामुळे तिने आपल्या कौटुंबिक गोष्टी होमगार्डला सांगितल्या. एके दिवशी जेव्हा ती घरी एकटी होती, तेव्हा त्याने तिला ज्यूस प्यायला सांगितले. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ आणि फोटो काढले. दुसऱ्या दिवशी त्यांना दाखवून धमकावून पैसे घेतले. या वर्षी जानेवारीत तिची हैदराबादला बदली झाली.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी - काही दिवस गप्प बसलेल्या आरोपीने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. तो रात्री व्हिडिओ कॉल करून नग्नावस्थेत बोलण्यास सांगत असे. त्यामुळे पीडितेने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. अलीकडेच तो दोन महिन्यांसाठी हैदराबाद येथील कार्यालयात आला आणि 50 लाख रुपयांची मागणी केली. पीडितेने ही बाब तिची आई आणि आरोपीच्या पत्नीला समजावून सांगितली. यामुळे चिडलेल्या स्वामीने हे व्हिडिओ पीडितेच्या सोडून दिलेल्या पती आणि सासरच्या लोकांना पाठवले. पैसे न दिल्यास सोशल मीडियावर पोस्ट करू, असे सांगितले. आपला छळ सहन न झालेल्या पीडितेने 22 तारखेला जुबली हिल्स पोलिसांकडे तक्रार केली आणि आयपीसीच्या कलम 376, 354D, 506, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली.

हेही वाचा - Abuse Minor Girl : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.