नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रेय होसाबळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारांना स्थान असल्याचे म्हटलं. संघातील अनेकांची मते डाव्या आणि उजव्या विचारसरणीसारखी असल्याचेही त्यांनी सांगितले. दत्तात्रेय होसाबळे यांनी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी लिहिलेल्या ''द हिंदुत्व पॅराडिग्म'' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी ते बोलेत होते.
उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारांना संघात संघात स्थान आहे. कारण, हे मानवी अनुभव आहेत. मी संघात आहे. आम्ही उजव्या विचारसरणीचे आहोत, असे कधीच भाषणात म्हटलेलं नाही. आम्ची अनेक मते डाव्या विचारसरणीसारखी आहेत. तर निश्चितपणे काही तथाकथित उजव्या विचारांचीही मते आहेत, असे होसाबळे म्हणाले.
भारतीय परंपरामध्ये कोणताही पूर्णविराम नाही. भारताच्या भौगोलिक राजकारणासाठी डावी आणि उजवी या दोन्ही विचारधारा गरजेच्या आहेत. पश्चिम भाग हा पूर्णपणे पश्चिमी नाही आणि पूर्व पूर्णपणे पूर्व नाही. त्याचप्रमाणे, डावे पूर्णपणे डावे नाहीत आणि उजवे पूर्णपणे उजवे नाहीत. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणानंतर पूर्व आणि पश्चिम यांच्यातील संघर्षाच्या चर्चा फिक्या पडल्या आहेत.
जग डाव्या विचारसरणीकडे वळाली होती किंवा त्यांना डावीकडे जाण्यासाठी भाग पाडले जात आहे, असे म्हणता येईल. मात्र, आता परिस्थिती अशी आहे की जग उजव्या विचारसरणीकडे वळत आहे. म्हणजेच आता आपण मध्यभागी आहोत. हेच हिंदुत्व आहे. उजवी आणि डावी दोन्हीपैंकी कोणतीही विचारसरणी आपल्या जखडलेली नाही, असे होसाबळे म्हणाले.
दत्तात्रय होसबळे यांच्याविषयी....
दत्तात्रय होसबळे हे मूळचे कर्नाटकच्या शिमोगा भागातील आहेत. 66 वर्षीय होसबळे यांनी वयाच्या 13 व्या वर्षी संघाशी स्वयंसेवक म्हणून जोडले गेले आहेत. 1972 सालापासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं. आणीबाणीच्या काळात त्यांनीही तुरुंगवास भोगला होता. विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री पदाची जबाबदारीही त्यांनी हाताळली होती. तसेच अभाविपच्या देशभरातील विस्तारातही त्यांचा वाटा होता. 2009 साली त्यांना संघाच्या सह-सरकार्यवाहपदाची जबाबदारी देण्यात आली. 2014 साली पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावासाठी आग्रही असणाऱ्यांमध्ये दत्तात्रय होसबळे यांचाही प्रामुख्याने समावेश होता.