लखनऊ : उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एका फौजदारी खटल्यात दिलेल्या आदेशात गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची गरज व्यक्त केली आहे. धार्मिक म्हणींचा हवाला देत न्यायालयाने म्हटले आहे की, जे गायीला मारतात ते नरकात जातात आणि त्यांच्या शरीरावर केस असतील तेवढी वर्षे नरकात राहावे लागते. या निरीक्षणांसह गोहत्या कायद्यांतर्गत दाखल झालेला खटला रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. बाराबंकीचे रहिवासी मोहम्मद अब्दुल खालिक यांची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी हा आदेश दिला.
गोहत्या बंदीस प्रभावी निर्णय घेण्याची गरज : कोर्ट पुढे म्हणाले की, देशात गोहत्या बंद करण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गोहत्या बंद करण्यासाठी प्रभावी निर्णय घ्यावा. न्यायालयाने सांगितले की, हिंदू धर्मात गायीला सर्वात पवित्र प्राणी मानले जाते. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूच्या रूपातही तिची पूजा केली जाते.
गो दान सर्वश्रेष्ठ : धार्मिक ग्रंथांचा हवाला देत न्यायालयाने म्हटले की, वैदिक काळापासून मनुस्मृती, महाभारत आणि रामायणात वर्णन केल्याप्रमाणे गाई वंशाचे आर्थिक महत्त्व तसेच धार्मिक महत्त्व आहे. गाईपासून मिळणाऱ्या पदार्थांपासून पंचगव्य ते अनेक पदार्थ बनवले जाते, म्हणूनच पुराणात गाय दानाला सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. रामाच्या लग्नातही गायी भेट देण्याचे वर्णन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मोहम्मद अब्दुल खालिक यांची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी हा आदेश दिला.
अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय : अलाहाबाद न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी ज्यामध्ये गायीला भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणून वर्णन करण्यात आले होते. गाय हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून; तिला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, असेही न्यायालयाने म्हटले होते. तेव्हापासून गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तर केंद्र सरकारला गायींच्या संरक्षणाचा हिंदूंच्या मूलभूत अधिकारांमध्ये समावेश करावा, अशी सूचना केली होती. गायीला कोणत्याही एका धर्मात बांधता येणार नाही, हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. आपली संस्कृती जतन करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि केवळ चव घेण्यासाठी कोणालाही मारून खाण्याचा अधिकार दिला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.
हेही वाचा : National Safety Day : का केला जातो 'राष्ट्रीय सुरक्षा दिवस' साजरा, काय आहे उद्देश