बहादूरगड - हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील बहादूरगढमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला असून एक एक मूलही जखमी झाले. मृतांमध्ये एक मुलगी आणि तीन महिलांचा समावेश आहे. पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत.
केएमपी एक्स्प्रेस वे हायवेवर बहादूरगडमधील बदली आणि फारुखनगर दरम्यान हा अपघात झाला. अर्टिगा कारमधील लोक गुरुग्रामच्या दिशेने जात होते. या दरम्यान, एका वेगवान ट्रकने मागून कारला धडक दिली. ज्यामुळे आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही आणि पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बहादूरगड सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. फरार ट्रकचालकाचा शोध सुरू असून जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे घटनास्थळी पोहोचलेल्या तपास पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अपघातात ठार झालेले लोक उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. खरं तर फिरोजाबादच्या नागला अनूप गावातील लोक गोगा मेडीतून घरी परत जात होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्व लोक भाड्याच्या अर्टिगा कारमध्ये बसले होते. या कारमध्ये एकूण 11 लोक होते. या अपघातातून फक्त वाहन चालक, एक महिला आणि एक बालक बचावले आहेत.
हेही वाचा - केवळ पाच विटा आणि एक मूर्ती ठेवल्याने ते ठिकाण धार्मिक स्थळ होत नाही - दिल्ली उच्च न्यायालय