पंचकुला - रणजीत सिंह हत्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने एक मोठा निकाल देताना राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आता विशेष सीबीआय न्यायालय 12 ऑक्टोबर रोजी सर्व आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. याप्रकरणात रामरहीमसह कृष्णलाल, जसवीर, सबदील आणि अवतार हेही आरोपी आहेत.
काय आहे प्रकरण -
रणजीत सिंह हे डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर होता. त्याची 2002 मध्ये रणजीत सिंहची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणात रामरहीमवर हत्येचा आरोप करण्यात आला होता. तसेच 2003 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. रामरहीम सद्या रोहतकच्या सुनारिया कारागृहात बंद आहे. पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला दोन साध्वींवर बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. तसेच त्याला 20 वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली आहे. तसेच 2019 मधल्या सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी सुद्धा रामरहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रावर वीज टंचाईचे संकट.. राज्याला कोळसा न देण्याचा केंद्र सरकारचा डाव, काँग्रेसचा आरोप