नवी दिल्ली - दोन महिला साध्वींवर बलात्काराचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. राम रहीमला रोहतकमधील सुनारिया तुरुंगामधून 13 जुलैला सकाळी सात वाजता दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून राम रहीमची रुग्णालयातून सुटका केली.
तब्येत बिघडल्यामुळे यामुळे राम रहीमला रोहतकमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रात्रभर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखत असल्याने राम रहीमला एम्स रुग्णालयात आणल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. डॉक्टरांनी छातीची तपासणी करून त्याची रुग्णालयातून सुट्टी केली आहे. गेल्या महिन्यात आरोपी गुरमीतला कोरोनाची लागण झाली होती.
हेही वाचा-यूपीत मारहाणीचे चित्रीकरण करताना युवकाला लागली गोळी, VIDEO व्हायरल
हा आहे गुरमीत राम रहीमवर आरोप
दोन महिला साध्वीवरील बलात्कार प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात ते रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तसेच पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याला विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्येनंतर तब्बल १६ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला होता.
हेही वाचा-NEET PG 2021 exam 11 सप्टेंबरला होणार- मनसुख मांडवीय
आपल्याला शेती करायची असल्याचे कारण सांगत त्याने 2019 मध्ये पॅरोल मागितला आहे. त्यांच्या या मागणीवर तुरुंग अधिक्षकांनी सिरसाचे पोलीस आयुक्तांना पत्र लिहुन कायदेशीर बाबींवर सल्ला मागितला होता. शेती करण्यासाठी गरमीत राम रहिमने ४२ दिवसांची पॅरोल मागितली होती. मात्र, हा पॅरोल मंजूर करण्यात आला नव्हता.