अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका महिलेला तीन रुग्णालयांनी प्रवेश नाकारल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या महिलेला कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. त्यामुळे २२ एप्रिलला तिच्या पतीने १०८ नंबरवर कॉल करत रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला रिक्षातूनच रुग्णालयात नेले. शहरभरात फिरुन तो वेगवेळ्या रुग्णालयांमध्ये बेडसाठी प्रयत्न करत होता. मात्र, तीन रुग्णालयांनी तिला प्रवेश नाकारला. त्यानंतर अखेर तिला एका रुग्णालयात बेड मिळाला. मात्र, याठिकाणी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, रुग्णालयांनी हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आपल्या पत्नीला बेड मिळावा यासाठी या पतीला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले होते.
हेही वाचा : रेमडेसिवीर बाहेर विकून रुग्णाला दिले सलाईन वॉटर; यूपीच्या रुग्णालयातील प्रकार