अहमदाबाद (गुजरात) - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायांमध्ये गुजरातचा महत्वपुर्ण सहभाग राहिला आहे. (Micro, Small, Medium Enterprises ) यापुढेही येथील व्यावसायाचे मोठे योगदान यामध्ये राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची हाक दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उद्योगधंदे वाढत आहेत हे एक विकासाचे पाऊल आहे ( Narayan Rane ) अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. अहमदाबाद येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) भवनाचे राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
देशाच्या आर्थिक विकासात ही संस्था एक महत्वाची
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या इमारतीचे भूमिपुजन केले होते. त्यावेळी शहा यांनी हे भवन मोठ्या सुविधा उपलब्ध करून देईल. तसेच, येणाऱ्या काळाता त्याचा उद्योग व्यावसायांना मोठा फायदा होईल असही शहा म्हणाले होते. ( medium industrialists ) त्यावर राणे यांनी शहा यांच्या भाषणाचा संदर्भ देत देशाच्या आर्थिक विकासात ही संस्था एक महत्वाची भागीदारी असेल अस राणे म्हणाले आहेत.
चीनमध्ये काही सुक्ष्म, लघु उद्योग बंद झाले
"उत्पादनाच्या बाबतीत चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक उत्पादनात चीन 64 टक्के वाटा घेऊन आघाडीवर आहे. मात्र, अनेक कंपन्या (त्या देशात) बंद होत आहेत. त्यामुळे मोठ्या आणि मध्यम उद्योगपतींनी ( medium industrialists ) या संधीचे सोने करून घ्यावे. या सर्वे उत्पादनांचे भारतात उत्पादन सुरू करण्याचे आवाहनही राणे यांनी यावेळी केले आहे. चीनमध्ये सुक्ष्म आणि लघु स्वरूपाचे उद्योग बंद होत आहेत. तर काही या अगोदरच बंद झालेले आहेत. दरम्यान, चीनमधील हे उद्योग का बंद होत आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे असही ते म्हणाले आहेत.