द्वारका : गुजरातच्या राजकारणात(Gujarat Election 2022 ) दशकांनंतर तिसऱ्या पक्षाचा म्हणजेच आम आदमी पक्षाचा प्रवेश झाला आहे. या निवडणुकीत तिरंगी युद्ध रंगले आहे. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी (Isudan Gadhvi) यांचा खंभलिया विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला (Khambhalia assembly seat result) आहे.
'आप'च्या एंट्रीने समीकरणे बदलली : गुजरातमधील तिरंगी लढतीत आम आदमी पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भानवड विभागातील ग्रामीण व शहरी भाग खंभळीया मतदारसंघात महत्त्वाचा मानला जातो. येथे जो आघाडी घेईल तो उमेदवार विजेता ठरू शकतो. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी आघाडी मिळवून देणारा खंभलिया तालुक्यातील सलाया व वडिनार भाग यापूर्वीही काँग्रेससाठी फायदेशीर ठरला होता. मात्र यावेळी या भागांमध्ये आम आदमी पक्षाचाही प्रभाव दिसून येत आहे.
तिन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार : खंभालिया विधानसभा जागेवर कॉंग्रेस आणि भाजपने अहिर समाजातील उमेदवारांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार विक्रम माडम यांना तिकीट दिले आहे. तर आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेल्या इसुदान गढवी निवडणूक लढवत आहेत. या हाय प्रोफाईल नेत्यांमुळे संपूर्ण निवडणुकीत प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. 1970 ते 1995 पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यानंतर 1995 ते 2014 पर्यंत भाजप आणि पुन्हा 2014 पासून काँग्रेस या जागेवर निवडून येत आहे.
चुरशीची लढत : गेल्या निवडणुकीत जामनगरचे माजी खासदार विक्रम माडम यांनी भाजपचे दिग्गज कारू चावडा यांचा 10,000 हून अधिक मतांनी पराभव करून ही जागा जिंकली होती. 2017 मध्ये विक्रम मडाम यांना 79,779 आणि भाजपच्या कारू चावडा यांना 68,891 मते मिळाली होती. यंदा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अहिर समाजाचे उमेदवार उभे केले आहेत. इसुदान हे सुमारे 14,000 मते असलेल्या गढवी चरण समाजातून आलेले आहेत. मात्र त्यांना शेतकरी, तरुण वर्ग तसेच मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळतो आहे.