ETV Bharat / bharat

Gudi Padva 2023 : वर्ष 2023 मध्ये कधी आहे गुढीपाडवा?, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व, पध्दत

author img

By

Published : Feb 14, 2023, 5:35 PM IST

गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे. तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.

Gudi Padva 2023
गुढीपाडवा सण

हैदराबाद : हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की, चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हे गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो

का साजरा केला जातो : गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे. तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाला सुरुवात होते. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? : गुढीपाडवा विशेषत: महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखविला जाते.

गुढीपाडव्याचे महत्त्व : पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.

गुढी पाडव्याची पूजा पद्धत : 1. गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे. 2. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं. 3. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. गुढीला आंब्याची पाने, नवे कपडे आणि फुलांनी आणि गाठी घालून सजावलं जाते. 4. नंतर लोक भगवान ब्रह्माची पूजा करतात. 5. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा केली जाते.

पूजा मुहूर्त : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २१ मार्च २०२३ रोजी रात्री १०.५२ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २२ मार्च २०२३ रोजी रात्री ८.२० वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी आहे. पूजा मुहूर्त 22 मार्च 2023 रोजी सकाळी 06.29 ते सकाळी 07.39 वाजेपर्यंत आहे.

हेही वाचा : Holi 2023 : 2023 मध्ये कधी आहे होळी ? होलिका दहनाची तारीख, शुभ वेळ आणि पौराणिक कथा जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.