ETV Bharat / bharat

Suicide Because Of Dowry : हुंडा न देऊ शकल्यामुळे तरुणीची आत्महत्या, व्हिडिओद्वारे व्यथा मांडली - suicide because of dowry

उत्तर प्रदेशच्या बदायूँमध्ये लग्न मोडल्यामुळे एका तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने व्हिडिओ बनवून लग्न मोडण्याचे कारण सांगितले. वरपक्षाने लग्नापूर्वी आणखी हुंड्याची मागणी केली होती. जे तिचे कुटुंब पूर्ण करू शकले नाही. वाचा पूर्ण बातमी...

Suicide Because Of Dowry
हुंड्यामुळे आत्महत्या
author img

By

Published : Aug 14, 2023, 7:20 PM IST

बदायूँ : उत्तर प्रदेशच्या बदायूँ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने वरपक्षाने लग्नापूर्वी जास्त हुंडा मागितल्याने आत्महत्या केली. सरकारी नोकरीत असलेल्या या तरुणाने लग्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर हुंड्याची मागणी वाढवत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे लग्न पुढे ढकलले गेले होते. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने व्हिडीओ बनवून आपली व्यथा मांडली. पोलिसांनी याची माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.

वरपक्षाने आणखी हुंड्याची मागणी केली : माहितीनुसार, वजीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बागोल गावात राहणारा विकास या तरुणाचा सपनाशी विवाह निश्चित झाला होता. सपनाने रविवारी रात्री उशिरा आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की, 'तिचे लग्न 22 एप्रिल 2023 रोजी होणार होते. लग्नपत्रिका छापून त्यांचे वाटपही करण्यात आले. घरात लग्नाची तयारी सुरू होती. दरम्यान, 2 एप्रिल रोजी विकासने फोन करून आणखी हुंड्याची मागणी केली. जे तिचे कुटुंब पूर्ण करू शकले नाही. त्यांनी विकासला समजावले पण तो मान्य झाला नाही. विकास सतत फोनवरून मानसिक छळ करत होता. या सर्व प्रकारामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले.'

बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली : आत्महत्येपूर्वी तरुणीने आणखी एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत ती म्हणाली की, 'लग्न न केल्यामुळे संपूर्ण समाज तिची बदनामी करत आहे, जे तिला सहन होत नव्हते. मी या कलंकासह माझे संपूर्ण आयुष्य जगू शकणार नाही. आई-बाबा मला माफ करा', असे तिने म्हटले आहे. तिने हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आणि त्यानंतर आत्महत्या केली.

तरुण आयकर कार्यालयात कारकून आहे : या प्रकरणी मुलीचे वडील जगबीर सिंह सांगतात की, हे लग्न वर्षभरापूर्वीच ठरले होते. 22 एप्रिलला लग्न होणार होते. हुंडा देण्यासाठी मुलाच्या पालकांकडून २१ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. मात्र लग्नाच्या 20 दिवस आधी त्यांनी आणखी 30 लाख रुपये आणि कारची मागणी केली. आम्ही यासाठी असमर्थता दर्शवताच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. आम्ही लग्नपत्रिकांचे वाटपही केले होते', असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, हा तरुण आयकर कार्यालयात कारकून आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. सध्या तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

हेही वाचा :

  1. Sarpanch Bribery Case: कंपनीचे होर्डिंग लावण्याकरिता सरपंचाने मागितली लाच; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
  2. Husband Kidnapping Case: बायकोनेच दिली डॉक्टर नवऱ्याच्या अपहरणाची सुपारी...मग पुढे काय झाले...वाचा
  3. Minor Girl Rape : जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.