भोपाळ - देशभरात 'द काश्मीर फाईल्स' ( The Kashmir Files ) चित्रपटाची चर्चा सुरु आहे. विरोधक आणि सरकार यांच्यामध्ये या चित्रपटावरून वादविवाद सुरु आहे. त्यातच आता मध्यप्रदेशात पंडितांच्या हत्याकांडाशी संबंधित कागदपत्रे संग्रहित ठेवण्यासाठी जेनोसाइड म्यूजियमची ( Genocide Museums In Bhopal ) उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( Director Vivek Agnihotri ) यांनी घोषणा केली आहे.
'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काश्मिरी पंडितांसोबत स्मार्ट सिटी पार्क येथे वृक्षारोपण केले. यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळमध्ये जेनोसाइड म्यूजियम बांधण्याची घोषणा केली आहे.
-
कश्मीर से विस्थापित पंडित परिवारों के दर्द को दुनिया ने जाना है। इस संबंध में श्री विवेक अग्निहोत्री जी ने मध्यप्रदेश में संग्रहालय और कला केंद्र की स्थापना का सुझाव दिया है। हमारी सरकार इसके लिए स्थान और आवश्यक सहायता उपलब्ध कराएगी। pic.twitter.com/xPe5wocWbu
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">कश्मीर से विस्थापित पंडित परिवारों के दर्द को दुनिया ने जाना है। इस संबंध में श्री विवेक अग्निहोत्री जी ने मध्यप्रदेश में संग्रहालय और कला केंद्र की स्थापना का सुझाव दिया है। हमारी सरकार इसके लिए स्थान और आवश्यक सहायता उपलब्ध कराएगी। pic.twitter.com/xPe5wocWbu
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 25, 2022कश्मीर से विस्थापित पंडित परिवारों के दर्द को दुनिया ने जाना है। इस संबंध में श्री विवेक अग्निहोत्री जी ने मध्यप्रदेश में संग्रहालय और कला केंद्र की स्थापना का सुझाव दिया है। हमारी सरकार इसके लिए स्थान और आवश्यक सहायता उपलब्ध कराएगी। pic.twitter.com/xPe5wocWbu
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 25, 2022
विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे जेनोसाइड म्यूजियम बनवण्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे, असा प्रस्ताव ठेवला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवत सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून, तुम्ही आराखडा तयार करा, असे म्हटलं. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या पंडित कुटुंबांच्या वेदना जगाने जाणून घेतल्या आहेत. आमचे सरकार जेनोसाइड म्यूजियमसाठी जागा आणि त्यासाठी आवश्यक सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री चौहान म्हणाले.
या जेनोसाईड म्यूजियम मध्ये पंडितांच्या हत्याकांडाशी संबंधित कागदपत्रे ठेवली जाणार आहे. तसेच, 'द काश्मिर फाईल्स' चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.