ETV Bharat / bharat

Gandhi Jayanti 2023 : 'या' ठिकाणी आजही आहे गांधीजींचा चरखा, अनेकांना मिळतो रोजगार

Gandhi Jayanti 2023 : राजधानी दिल्लीतील काही लोकांनी महात्मा गांधी यांच्याशी संबंधित काही आठवणी अनेक दशकांपासून जपल्या आहेत. हे लोक आजही चरख्यानं सूत काततात. हे सूत केरळला पाठवलं जातं, तिथे त्यापासून कापड बनविले जाते.

Gandhi Jayanti 2023
Gandhi Jayanti 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 7:54 AM IST

पहा व्हिडिओ

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांनी नेहमीच स्वदेशीचा पुरस्कार केला होता. ते स्वत: चरखा वापरून सूत कातायचे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत देशभरातील लाखो लोकांनी चरखा वापरण्यास सुरुवात केली. मात्र कालांतरानं चरख्याचा वापर कमी झाला. आता २१ व्या शतकात तर चरखा फारसा कुठे वापरात दिसत नाही. मात्र राजधानी दिल्लीत एक अशी जागा आहे, जिथे काही लोक आजही सूत कातून आपला परिवार चालवतात. हे लोक गांधीजींना आपला आदर्श मानतात.

केरळला सूत पाठवलं जातं : गेल्या एका वर्षापासून चरखा वापरणं शिकत असलेल्या मिथुन कुमारनं सांगितलं की, तो गांधी संग्रहालयात चरखा चालवायला शिकला. याशिवाय युट्युबच्या माध्यमातूनही त्यानं याचे धडे घेतले. आता तो एका दिवसात सुमारे ४०० मीटर सूत काततो. याशिवाय तो सुताचे प्रत्येकी दोन किलोचे पॅकेट बनवून ते केरळला पाठवतो. येथे धाग्याचे रूपांतर कापडात होते. या ठिकाणाहून कपडे बनवले जातात. त्याचबरोबर त्यातून रुमाल, धोतर आदी बनवलं जातं.

पेटी चरखा : मिथुन आणि त्याची टीम ज्या चरख्यावर सूत बनवतात त्याला 'पेटी चरखा' म्हणतात. त्याची लांबी १६ इंच, रुंदी ९ इंच आणि खोली ३ इंच आहे. कापूस, पुन्नी, दोन चरखे आणि तखुआ यांच्या साहाय्यानं सूत तयार केलं जातं. सध्या दिल्लीतील नॉर्थ एव्हेन्यू येथे राज्यसभा खासदार अनिलकुमार हेगडे यांच्या घरी सूत कातणारी चार जणांची ही टीम आहे. सूत कापसाच्या साहाय्यानं बनवलं जातं. ज्या कापसापासून सूत बनवतात त्याला पुन्नी म्हणतात. सूत तयार झाल्यावर त्याच्या एका गाठीला गुंडी म्हणतात.

  • चरख्याचा इतिहास : भारतातील चरख्याचा इतिहास खूप जुना आहे. महात्मा गांधींच्या हयातीत याला चालना मिळाली. गांधीजींना १९०८ मध्ये इंग्लंडमध्ये असताना चरख्याची कल्पना सुचली. त्यानंतर १९१६ मध्ये साबरमती आश्रम (अहमदाबाद) स्थापन झाला. मोठ्या प्रयत्नांनी, दोन वर्षांनंतर त्यांना एका विधवा बहिणीजवळ एक चरखा सापडला. त्या काळी सर्व उभे चरखे असायचे.

चरख्याची रचना : उभ्या चरख्यामध्ये एक आसन, दोन खांब, एक फरई (चाक आणि आसन यांना जोडणारे लाकूड) आणि आठ ओळींचं एक चाक असतं. वेगवेगळ्या आकाराचे उभे चरखे देशाच्या अनेक भागात चालतात. चरख्याचा व्यास १२ इंच ते २४ इंच आणि स्पिंडल्सची लांबी १९ इंचांपर्यंत असते. आजच्या चरख्यांशी त्यावेळच्या चरख्या आणि तुकड्यांची तुलना केली की आश्चर्य वाटतं. आतापर्यंत मिळालेल्या चरख्यांपैकी चिकाकौल (आंध्र) चा उभा चरखा सर्वोत्कृष्ट होता. त्याच्या चाकाचा व्यास ३० इंच होता आणि स्पिंडल देखील बारीक आणि लहान होतं. त्यावर मध्यम दर्जाचे धागे तयार केले जायचे.

हेही वाचा :

  1. Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधींच्या सूचनेनुसार वाराणशीत बांधण्यात आलं होत मंदिर, 'या' मंदिराची खासियत पाहून मिळतो सर्वधर्मभावाचा संदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.