ETV Bharat / bharat

अलविदा 'फ्लाइंग सिख'! 'अशी' राहिली महान धावपटू मिल्खा सिंग यांची कारकिर्द... - अलविदा फ्लाइंग सिख बातमी

'फ्लाइंग सिख' या नावाने विख्यात असलेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929मध्ये पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये झाला होता. तर त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935मध्ये झाला होता, असेही सांगितले जाते.

Flying sikh milkha singh
महान धावपटू मिल्खा सिंग
author img

By

Published : Jun 19, 2021, 8:33 AM IST

Updated : Jun 19, 2021, 2:31 PM IST

हैदराबाद - भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले. याआधी त्यांच्या पत्नी आणि भारतीय व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोनामुळे निधन झाले होते. पद्मश्री मिल्खा सिंग 91 वर्षांचे होते. 1956 मध्ये पटियालात झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धदरम्यान ते प्रकाशझोतात आले होते. 1958मध्ये कटकमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये त्यांनी रेकॉर्ड तोडले होते. त्यांच्या कारकिर्दीबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा...

'फ्लाइंग सिख' या नावाने विख्यात असलेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929मध्ये पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये झाला होता. तर त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935मध्ये झाला होता, असेही सांगितले जाते. सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत व्यक्तिगत सुवर्ण पदक जिंकणारे एकमात्र पुरूष खेळाडू होते.

1959 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित -

क्रिडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे मिल्खा सिंग यांना 1959मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. 1960मधील ऑलिम्पिक स्पर्धेत 400 मीटर धावणे शर्यतीच्या अंतिम स्पर्धेत त्यांनी चौथा क्रमांक मिळवला होता. यासाठी ते सर्वाधिक आठवणीत आहे.

व्यक्तिगत जीवन -
मिल्खा सिंग यांचा विवाह निर्मल कौर यांच्यासोबत झाला होता. त्या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या. त्यांच्या परिवारात मुलगा गोल्फर जीव मिल्खा सिंग आणी तीन मुली आहेत.

जीवनप्रवास -

सैन्यदलात भरती होण्यासाठी त्यांना तीन वेळा नापास करण्यात आले होते. शेवटी 1952मध्ये ते सैन्यदलातील विद्युत मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत यशस्वीरित्या भरती झाले. सशस्त्र दलाचे त्यांचे कोच हवालदार गुरुदेव सिंग यांनी त्यांना धावण्यासाठी प्रेरित केले होते. यानंतर ते मेहनतीने अभ्यास करू लागले. 1956 मध्ये पटियाला येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान ते चर्चेत आले होते. 1958मध्ये कटकमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये त्यांनी रेकॉर्ड आधीचे विक्रम तोडले होते.

1964मध्ये त्यांनी टोक्यो येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. वर्ष 1958मध्ये त्यांनी रोममध्ये आयोजित ऑलम्पिक स्पर्धेतही 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेसोबत 1958मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त 1958मधील आशियाई स्पर्धा (200 मीटर और 400 मीटर) आणि 1962मध्ये आशियाई स्पर्धेतही (200 मीटर श्रेणी) त्यांनी आपल्या नावावर काही विक्रम केले.

पाक राष्ट्रपति अयुब खान यांनी दिले 'फ्लाइंग सिख' नाव -

1952मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी टोक्यो आशियाई क्रिडा स्पर्धेतील 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते अब्दुल खलीक यांचा पराभव केला होता. यानंतर मिल्खा सिंग यांना पाकिस्तानी राष्ट्रपति अयूब खान यांनी 'द फ्लाइंग सिख' यांचे नाव दिले.

1958मधील आशियाई क्रिडा स्पर्धेत मिळवलेल्या यशानंतर त्यांना भारतीय शिपाई या पदावरुन त्यांना कनिष्ठ कमिशन अधिकारी पदावर पदोन्नत करण्यात आले होते. यानंतर ते पंजाब शिक्षण मंत्रालयात ते क्रिडा संचालक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. 1998मध्ये ते या पदावरुन नियुक्त झाले. मिल्खा सिंग यांना मिळालेले पदक त्यांनी देशाला समर्पित केले. सुरुवातीला या सर्व पदकांचे नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये प्रदर्शन ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांना पटियालामधील एका खेळ संग्रहालयात स्थानांतरित करण्यात आले. मिल्खा सिंग यांनी रोमच्या ऑलम्पिक स्पर्धेत वापरलेले जोडे यांनाही क्रिडा मंत्रालयात जतन करुन ठेवण्यात आले आहे. या आदिदास जोड्यांना मिल्खा सिंग यांनी 2012मध्ये, राहुल बोस द्वारा आयोजित करण्यात आलेल्या एका धर्मदाय लिलावात दान केले होते. या जोड्यांना त्यांनी 1960च्या अंतिम स्पर्धेत वापरले होते.

'भाग मिल्खा भाग'

मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे नाव 'भाग मिल्खा भाग' असे आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात फरहान अख्तर आणि सोनम कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. जेव्हा मिल्खा सिंग यांना विचारण्यात आले की, त्यांनी आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनविण्यास परवानगी का दिली? तेव्हा ते म्हणाले, चांगले चित्रपट तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत असतात. ते पुढे म्हणाले होते की, मी स्वत: हा चित्रपट पाहणार आणि या चित्रपटात माझ्या जीवनातील घटना योग्यप्रकारे प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत की नाही, याबाबत निरीक्षण करणार. हा चित्रपट दाखवून तरुणांना अ‍ॅथलेटिक्समध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, जेणेकरुन जागतिक स्तरावर पदक जिंकून भारताला अभिमान वाटेल, हा त्यांचा उद्देश्य होता.

विक्रम आणि पुरस्कार -

  • 1958 मधील आशियाई क्रिडा स्पर्धेत 200 मीटर धावणे - प्रथम
  • 1958 मधील आशियाई क्रिडा स्पर्धेत 400 मीटर धावणे - प्रथम
  • 1958 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्ड शर्यतीत - प्रथम
  • 1959मध्ये पद्मश्रीने सन्मान
  • 1962 मधील आशियाई क्रिडा स्पर्धेत 400 मीटर धावणे - प्रथम
  • 1962 मधील आशियाई क्रिडा स्पर्धेत 4*400 रिले शर्यतीत - प्रथम
  • 1964 मधील कोलकाता राष्ट्रीय स्पर्धेत 400 मीटर धावणे - द्वितीय

Last Updated : Jun 19, 2021, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.