भदोही - सर्किटमधून पंडालमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 66 जण जखमी झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी सांगितले की, आरतीच्यावेळी पंडालमध्ये सुमारे 150 लोक उपस्थित होते. जळालेल्या लोकांना अनेक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशीही माहिती देण्यात आली आहे. या सर्वांना वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. या घटनेत तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एडीजी वाराणसी, आयुक्त योगेश्वर राम मिश्रा, डीआयजी, जिल्हा अधिकारी, पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी एडीजी राम कुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय एसआयटी स्थापन केली. या टीममध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एक्सईएन हायहिल आणि अग्निशमन सुरक्षा अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. एसआयटीच्या तपासात प्रथमदर्शनी आगीचे कारण हॅलोजन लाइट तापल्याने लागले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरई पोलीस ठाण्याजवळील पोखरा येथील दुर्गा पंडालला रात्री उशिरा अचानक आग लागल्याने 50 हून अधिक जण जळून खाक झाले. यामध्ये अंकुश आणि शिवांगी यांचा मृत्यू झाला. तर अनुष्का (1), ऋषभ चौरसिया (2), गुलाबी देवी (16), सरिता चौरसिया (14), संध्या चौरसिया (14), साक्षी (18), रंजना देवी (30) यांच्यासह 50 हून अधिक जण गंभीर भाजले आहेत. त्यांना तात्काळ सूर्या ट्रॉमा सेंटर, आनंद हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र गोपीगंज औरई येथे पाठवण्यात आले. येथून प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले.
आगीची माहिती मिळताच औरई परिसरात एकच खळबळ उडाली. रुग्णवाहिका आणि पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची वाहने रस्त्यावर धावत राहिली. एडीजी वाराणसी झोन, आयुक्त, डीआयजी, जे जळलेल्या लोकांना चांगले उपचार देण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी तात्काळ संबंधित रुग्णालयांना बोलावले आणि त्यांना निर्देश दिले. हा अपघात एवढा भीषण होता की, परिसरात गोंधळाचे वातावरण असून औरई जीटी रोडसह अन्य मार्गांवर गर्दी झाली होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्गापूजेसह धार्मिक कार्यक्रमांशी संबंधित समित्यांना पूजा पंडाल बांधताना विद्युत आणि अग्निसुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रशासनाने या आयोजन समित्यांशी संवाद साधून पूजा मंडपात विद्युत आणि अग्निसुरक्षा मानकांचे पालन केले पाहिजे.
मृतांची नावे -
- अंकुश सोनी (वय 10 वर्ष)
- हर्षवर्धन (वय 08 वर्ष)
- जया देवी (वय, 45 वर्ष)
- नवीन (वय 10 वर्ष)
- आरती देवी (वय 48 वर्ष)