ETV Bharat / bharat

धर्मांतरविरोधी अध्यादेशांतर्गत उत्तर प्रदेशात पहिली अटक - उत्तर प्रदेश क्राईम न्यूज

बरेली जिल्ह्यातील देवरानिया भागात एका 20 वर्षीय विवाहित महिलेला 'अपहरण करण्याची धमकी' आणि 'धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली' अहमदवर उत्तर प्रदेश कायद्याविरुद्ध धर्म परिवर्तन प्रतिबंध अध्यादेश- 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश धर्मांतरविरोधी अध्यादेशांतर्गत पहिली अटक
उत्तर प्रदेश धर्मांतरविरोधी अध्यादेशांतर्गत पहिली अटक
author img

By

Published : Dec 6, 2020, 6:19 PM IST

बरेली - नवीन धर्मांतरण अध्यादेशांतर्गत पहिला गुन्हा नोंदवल्यानंतर तीन दिवसांनी उत्तर प्रदेशातील बरेली पोलिसांनी या कायद्यांतर्गत पहिली अटक केली.

'जबरदस्तीने' झालेल्या धर्मांतराविरूद्ध अध्यादेश आणल्यानंतर काही तासानंतर ओवैश अहमद (वय 22) याच्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

बरेली जिल्ह्यातील देवरानिया भागात एका 20 वर्षीय विवाहित महिलेला 'अपहरण करण्याची धमकी' आणि 'धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली' अहमदवर उत्तर प्रदेश कायद्याविरुद्ध धर्म परिवर्तन प्रतिबंध अध्यादेश- 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बराच काळ लपला होता. 'त्याला गोळ्या घातल्या जाण्याची भीती होती,' असे त्याने म्हटले आहे.

'आपल्याला गोळ्या जातील, हा कदाचित त्याचा समज असू शकेल. परंतु, असे कोणतेच आदेश नसल्यामुळे पोलिसांनी असे करण्याचा कधीही विचार केला नव्हता," असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संसारसिंग म्हणाले.

'आम्ही फक्त त्याचा शोध घेत होतो आणि त्यासाठी अनेक पथके शेजारच्या जिल्ह्यातही तैनात करण्यात आली होती. बुधवारी त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. त्यांनी त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. आम्ही आता तक्रारदार, साक्षीदारांची जबाब नोंदवून घेऊ आणि या प्रकरणातील तपास पूर्ण करू,' असे ते पुढे म्हणाले.

हेही वाचा - उत्तर प्रदेशातील बरेली येथे 'लव्ह जिहाद' अध्यादेशांतर्गत पहिला गुन्हा दाखल

अहमदची एका महिलेशी शाळेत असल्यापासूनची मैत्री होती. गेल्या वर्षी ही मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी अहमदवर गुन्हा दाखल केला होता. त्याच्या सांगण्यावरून ती घरातून पळून गेली, हे नंतर उघडकीस आले होते. नंतर त्यांनी त्यांना एकत्र राहायचे असल्याचे सांगितले. त्या वेळी, या महिलेला भोपाळ येथून ताब्यात घेण्यात आले. ते दोघे मुंबईला जाण्याच्या विचारात होते.

या प्रकरणात या महिलेचे वडील तक्रारदार आहेत. त्यांचा आरोप आहे की, या महिलेचे दुसर्‍या पुरुषाबरोबर काही महिन्यांनंतर लग्न झाले होते. परंतु, अहमदने त्या महिलेचा पाठलाग सुरू केला. गेली तीन वर्षे अहमद तिला धमकावत होता, असा आरोप महिलेच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

अहमदविरोधात आयपीसी कलम 504 आणि 506 आणि अध्यादेश कलम 3/5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदने पत्रकारांना सांगितले आहे की, 'मला 'लव्ह जिहाद अध्यादेशां'तर्गत अटक करण्यात आली आहे. या महिलेशी माझा काही संबंध नाही. वर्षभरापूर्वी तिचे लग्न झाले. मी निर्दोष आहे.'

हेही वाचा - मध्य प्रदेश : धर्मांतरणासाठी पत्नीवर दबाव आणणाऱ्या पतीला अटक

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.