भोपाळ : मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ यांच्याविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना विषाणूप्रकरणी वक्तव्य करुन, लोकांमध्ये भीती पसरवल्याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शनिवारी उज्जैनमध्ये आपल्या पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य केले होते. "जगात सध्या पसरलेला कोरोना हा 'इंडियन स्ट्रेन' म्हणून ओळखला जातो आहे" अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरुन, भाजपाच्या प्रतिनिधी समितीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर कमलनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कमलनाथ यांच्या वक्तव्यामुळे सध्याच्या परिस्थितीमुळे आधीच घाबरलेल्या जनतेमध्ये अजून भीती पसरू शकते. तसेच, त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या नियमांचेही उल्लंघन केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
कमलनाथ यांच्यावर आयपीसीच्या कलम १८८ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या सेक्शन ५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळच्या क्राईम ब्रँच पोलीस ठाण्यात रविवारी हा गुन्हा नोंदवण्यात आला.
हेही वाचा : गंगेमधील मृतदेहांसाठी पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार - राहुल गांधी