फारुख अब्दुल्ला इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, आधी काश्मीरमध्ये कलम 370 मुळे दहशतवाद आहे, आता काश्मीरमध्ये 370 नाही, मग दहशतवादी घटना का घडत आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे? काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये फारुख अब्दुल्ला यांचाही समावेश होता. (Farooq Abdullah On Target Killing) आता त्यांनी टार्गेट किलिंगबाबत हे वक्तव्य केले आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये हिंदू शिक्षकाच्या हत्येवर फारुख अब्दुल्ला यांनी सर्वांना ठार मारले जाईल, असे वक्तव्य केले होते. दुसरीकडे, पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांनी या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकारवर निशाणा साधताना दोघांनीही धिक्कार आणि शोक व्यक्त करणारे शब्द पोकळ आहेत असे म्हणत, जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असे आश्वासन दिले होते.
"कलम 370 रद्द करून (ऑगस्ट 2019 मध्ये) चार वर्षे झाली आहेत. पण तरीही लोक मरत आहेत. कलम 370 जर हत्येला जबाबदार असेल, तर मग या निष्पाप पंडित पूरण कृष्ण भटची हत्या का झाली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कलम 370 हत्येसाठी जबाबदार नाही, कारण दहशतवाद बाहेरून प्रायोजित केला जात आहे असही ते म्हणाले आहेत.
पूरण कृष्ण भट यांच्यावर दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील त्यांच्या घराजवळ हल्ला करण्यात आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस उपमहानिरीक्षक सुजित कुमार म्हणाले की, काश्मीर फ्रीडम फायटर (KFF) गट, एका अतिरेकी संघटनेचे प्रॉक्सी नाव असून, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
घटनाक्रम
25 मे 2022 - काश्मीर टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
24 मे 2022- दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात 7 वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.
17 मे 2022 - बारामुल्ला येथील एका वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले.
12 मे 2022 - काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता.
12 मे 2022- पुलवामा येथे पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
9 मे 2022 - शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार. यात एका जवानासह दोघे जखमी झाले.
2 मार्च 2022 - कुलगामच्या सांडूमध्ये दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली.