नवी दिल्ली - मागील चार दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. आज शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. दिल्लीत येणारे पाचही रस्ते आम्ही बंद करू असा इशारा आंदोलकांनी दिला. तसेच आपल्या पाच मागण्या सरकारपुढे मांडल्या.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
- तीन केंद्रीय कृषी कायदे शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिणे असून त्यांना तत्काळ रद्द करावे.
- किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि माल खरेदीची किंमती हमी द्यावी
- वीज अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा
- शेतातील पिकांचे भूसकट जाळण्यावरली दंड रद्द करावा
सिंघू आणि टीकरी सीमेवर शेतकऱ्यांचा ठिय्या
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यास सरकारने परवानगी नाकारली आहे. बुरारी येथील मैदानावर सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. मात्र, जंतरमंतरवरच आंदोलन करण्यावरून शेतकरी ठाम आहेत. हरयाणा आणि दिल्लीमधील सिंघू आणि टिकरी येथील सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले असून त्यांनी तेथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. पंजाब, हरयाणा हिमाचल प्रदेश आणि इतरही अनेक राज्यातून शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र, पोलीस आता त्यांना दिल्लीत प्रवेश देत नाही.