ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलन : आगामी आठ महिन्यांची तयारी ठेवा, राकेश टिकैत यांचे शेतकऱ्यांना आवाहन - राकेश टिकैत लेटेस्ट न्यूज

शेतकरी आंदोलनाला आणखी धार देण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत देशभरात सभा घेत आहेत. शुक्रवारी टिकैत यांनी जोधपूरमध्ये शेतकरी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

राकेश टिकैत
राकेश टिकैत
author img

By

Published : Mar 13, 2021, 9:05 AM IST

जोधपूर - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 100 पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. शेतकरी आंदोलनाला आणखी धार देण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत देशभरात सभा घेत आहेत. शुक्रवारी टिकैत यांनी जोधपूरमध्ये शेतकरी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच आंदोलन आगामी आठ महिनेही चालू राहू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारीत राहावे, असे ते म्हणाले.

राकेश टिकैत यांची सभा

सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नसून शेतकरी आंदोलनाची लढाई आगामी आठ महिनेही चालू राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी आठ महिन्यांची व्यवस्था करून ठेवावी. आंदोलनाशी दिशा योग्य आहे. सरकार चर्चा करत नाही. त्यामुळे आम्ही गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत, असे टिकैत म्हणाले.

बंगालमधील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आम्ही तिथेही जाणार आहोत. तेथील शेतकऱ्यांना देखील एमएसपीचा लाभ मिळत नाही. भाजपाला मतदान करू नका, असे आवाहन आम्ही त्यांना करणार आहोत, असे टिकैत यांनी सांगितले. मोदी सरकारला घाबरून काही नेते शेतकरी आंदोलनाला समर्थन देत नसल्याचेही ते म्हणाले. देशातील सरकार ही फक्त दोन लोकांची सरकार आहे. ही सरकार कोणाचा सल्ला घेत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राकेश टिकैत आज नंदीग्रामध्ये घेणार सभा -

राकेश टिकैत आज पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात शेतकऱ्यांची सभा घेणार असल्याची माहिती आहे. सरकारमधील सगळे नेते पश्चिम बंगालमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे आम्ही आता तिथेच सरकारची भेट घेऊ, असे टिकैत म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान होणार आहे. नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उभ्या आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपाने सुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवलं आहे. शेतकरी नेते ममता बॅनर्जी यांना समर्थन देणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - भाजप आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न; विधानभवनात सॅनिटायझर केले प्राशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.