ETV Bharat / bharat

सुपरस्टार रजनीकांतची राजकारणातून माघार; चाहत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

रजनीकांत
रजनीकांत
author img

By

Published : Jan 1, 2021, 12:17 PM IST

चैन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारणात एन्ट्री करणार होते. मात्र, त्यांनी राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय रद्द केल्याने त्यांच्या एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

मुरुगेसन असे त्या व्यक्तीचे नाव आहे. राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय रजनीकांत यांनी रद्द करावा, अशी त्यांची इच्छा आहे. गुरुवारी ही घटना घडली. मुरगेसन यांनी स्वतःला आग लावत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवत ताबडतोप रुग्णालयात दाखल केले.

रजनीकांतची राजकारणातून माघार -

रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार होते. त्यांनी रजनीकांत मक्कल मंड्राम या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती. या पक्षाचे लॉन्चिंग ३१ डिसेंबरला करण्याचा निर्णय त्यांनी रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला होता. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्य पक्षाचे लॉन्चिंग रद्द केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली.

रजनीकांत मक्कल मंड्रामचे लॉन्चींग रद्द -

रजनीकांत यांचा 70 वा वाढदिवस चाहत्यांनी जोरदार साजरा केला. त्याचवेळी त्यांनी ३१ 31 डिसेंबरला रजनीकांत मक्कल मंड्राम या पक्षाचे लॉन्चिंग होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणाला कोणते नवे वळण मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन (मक्कल निधी माईम पक्षाचे अध्यक्ष) आणि रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास -

हैदराबादमध्ये रजनीकांत यांच्या अण्णात्थे चित्रपटाच्या शुटिंग सेटवर काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्यानंतर हे शुटिंग थांबवण्यात आले होते. त्यानंतर क्वारंटाईनमध्ये असलेल्या रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानंतर ते हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल झाले होते. प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.