आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून सकाळी ११ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ८० वा भाग आहे.
- राज्यात आजपासून चार ते पाच दिवस मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज
- कृषी कायद्या विरोधात आज नाशिकमध्ये शेतकरी व कॉंग्रेसचे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
- नागपूर महानगरपालिका आणि शासकीय कोणत्याही केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही.
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आज नवी मुंबईतील बेलापूर येथे केंद्रीय सदनमध्ये चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
करनाल (हरयाणा) - शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत असताना, आज (शनिवार) हरयाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या लाठीचार्जच्या विरोधात सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.सविस्तर वाचा...
सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.सविस्तर वाचा...
मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.सविस्तर वाचा...
सिल्लोड (औरंगाबाद) - तालुक्यातील उपली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघ दावाडी येथे मंगळवारी वळण रस्त्यावर तुषार महेर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह घरी नेण्यासाठी चक्क खाटेचा वापर करावा लागलेला आहे.सविस्तर वाचा...
नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानसिक स्वास्थ्य सध्या ठीक नाही. त्यांना मानसिक आधार मिळावा म्हणून सर्व शिवसैनिक प्रार्थना करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्रार्थना करावी, असेही राऊत म्हणाले आहेत. आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निमित्ताने संजय राऊत नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.सविस्तर वाचा...
पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर तालुक्यातील 21 गावात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांची संचारबंदी घातली आहे. तालुका प्रशासनाकडून कोरोना चाचण्यांवर भर दिला जात आहे. ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी करून लसीकरणावर भर दिला जात आहे.सविस्तर वाचा...
वसई (पालघर)- शहरात अनाथ असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. अजय कुमार विनोद जयस्वाल (34), मुन्ना यादव (28) आणि अक्रम चौधरी (34) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या वर्षी नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट दरम्यान सामूहिक बलात्काराशिवाय आरोपींनी तिच्यावर अनेक वेळा स्वतंत्रपणे लैंगिक अत्याचार केले होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.सविस्तर वाचा...
नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवामध्ये एका ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. प्राप्तिकर विभागाने या ग्रुपच्या 44 हून अधिक मालमत्तांवर छापे टाकले आहेत. हा ग्रुप आघाडीचा स्टील उत्पादक कंपनीचा आहे. या ग्रुपकडून पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवामध्ये व्यवसाय करण्यात येतो.सविस्तर वाचा...
लीड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील तिसरा सामना यजमान संघाने 1 डाव आणि 76 धावांनी जिंकला. हेडिंग्ले (लीड्स) येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघ चौथ्या दिवशी, दुसऱ्या डावात 278 धावांत ढेपाळला. भारतीय संघाचा हा या वर्षातील सर्वात मोठा पराभव आहे. इंग्लंडने या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताने लॉर्डस् येथे झालेल्या मागील सामन्यात विजय मिळवला होता.सविस्तर वाचा...
यवतमाळ - चार महिन्यापूर्वी घरातील कर्त्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंबाचा आधारच गेला. वृद्ध सासू-सासरे आणि पाच मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी विधवा महिलेवर आली. आभाळा एवढं दुःख गिळून पती चालवत असलेल्या रिक्षालाच तिने उदरनिर्वाहाचे साधन बनवले. नेर तालुक्यातील परजना या बंजारा बहुल 400 लोकसंख्या असलेल्या गावातील अरुणा अशोक जाधव असे या विधवा महिलेचे नाव आहे. ती रिक्षा चालवित आपल्या कुटुंबाचा गाडा यशस्वीरित्या हाकत आहे.सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
29 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज प्रवासात अडचणी येतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या राशीभविष्य