आज दिवसभरात/आजपासून -
- आज सकाळी 11 वाजता गुजरातमधील विविध प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे जिल्हा दौरा करणार आहेत.
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे येथे आज बैलगाडी, छकडा शर्यत भरवली आहे. मात्र, याला प्रशासनाने विरोध केला आहे. कारण, बैलगाडी शर्यतीला परवानगी नाही. मात्र, बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी पडळकरांनी बैलगाडी शर्यत भरवली आहे. त्यामुळे आज नक्की काय होणार? याकडे लक्ष असणार आहे.
- केंद्रीय मंत्री नाराय राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली आहे. ही यात्रा आज समता नगर पोलीस स्थानक येथून जाणार आहे.
- नागपूर व अमरावती मिशन लसीकरण अंतर्गत 200 वाहनांचे आज हस्तांतरण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे होणार याचे उद्घाटन होणार आहे.
- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सर्व विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार देखील उपस्थित असणार आहेत.
- आज नांदेड येथे मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन होणार आहे. याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केली आहे.
- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एक दिवसीय नाशिक दौरा होणार आहे.
- मुंबईत आज लसीकरण बंद, उद्या सुरू राहणार आहे.
- आजही बँका बंदच राहणार आहेत.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
पालघर - वाडा तालुक्यातील मेट येथील पेल टेक हेल्थ केअर या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 5 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. वाचा सविस्तर...
श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये गुरूवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार केले जात असून घटनास्थळी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. वाचा सविस्तर...
जालना - जालन्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली. ही यात्रा जालन्यात दाखल होताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच कराड यांना गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवले. तसेच भागवत कराड यांना गद्दार म्हणूनही संबोधण्यात आले. वाचा सविस्तर...
लखनौ/काबुल - उत्तर प्रदेशमध्ये तालिबानींचे समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. समाजवादी पक्षाचे खासदार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री मौसाना मसूद मदनी यांच्यानंतर प्रसिद्ध शायर मुनव्वर राना यांनी तालिबानींना समर्थन (Munawwar Rana Support Taliban) दिले आहे. तालिबानी लोक वाईट नाहीत. परिस्थितीमुळे ते तसे झाल्याचे राना यांनी अजब वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर...
अकलूज - अकलूज जवळील माळेवाडी येथे अपघात झाला. यात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. छाया पांडुरंग दांडगे आणि श्रुती अशी मृत्यू झालेल्या मायलेकीची नावे आहेत. तर श्रुतीचा भाऊ ओमकारही गंभीर जखमी झाला आहे. वाचा सविस्तर...
पालघर - पालघर जिल्हा मुख्यालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, पालघर मुख्यालयासाठी 307 कोटी 65 लाख रुपये खर्च आला आहे. वाचा सविस्तर...
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 32 वर्षांतील पापाचा घडा भरल्याचा आरोप शिवसेनेवर केला आहे. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. याच 32 वर्षांच्या कार्यकाळामध्ये राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांना हा पापाचा घडा दिसला नाही का? असा उलट प्रश्न मुंबईच्या महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 32 वर्षांतील पापाचा घडा भरल्याचा आरोप शिवसेनेवर केला आहे. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. याच 32 वर्षांच्या कार्यकाळामध्ये राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांना हा पापाचा घडा दिसला नाही का? असा उलट प्रश्न मुंबईच्या महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. वाचा सविस्तर..
नागपूर - यात्रा कोणीही काढली तर विजय महाविकास आघाडी सरकारचाच होणार याची खात्री असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. ते नागपूरत विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीला याचा काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर...
जळगाव - स्पेशल रिपोर्ट : एकनाथ खडसेंची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट? वाचा सविस्तर...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
- 20 ऑगस्ट राशीभविष्य : आज 'या' राशीवाल्यांना मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 ऑगस्ट : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या
- आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी