ETV Bharat / bharat

Encounter In Baramulla : बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा - काश्मीर झोन पोलीस

बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

Encounter In Baramulla
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 4, 2023, 7:12 AM IST

Updated : May 4, 2023, 8:07 AM IST

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम पायीन केरी परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून एक एके 47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे.

दोन दहतवाद्यांचा खात्मा : काश्मीरमधील वानिगम पायीन केरी या परिसरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली होती. त्यानंतर या बाबतची सविस्तर माहिती देण्याचेही काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कळवले होते. त्यानंतर याबाबत अपडेट देत पोलिसांनी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे अपडेट दिले आहे.

सुरक्षा दलाचे जवान घालत होते गस्त : भारतीय सुरक्षा दलाचे जवान गस्तीवर असताना त्यांना वानिगम पायीन केरी परिसरात संशयास्पध हालचाली आढळून आल्या. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र भारतीय सुरक्षा दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे या शोधमोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केल्याने आधीच सावध असलेल्या जवांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सध्या या परिसरात सुरक्षा दलाकडून कारवाई सुरुच आहे.

कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवादी ठार : बुधवारी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. बुधवारी सकाळी कुपवाडा जिल्ह्यातील पिचनाड माछिल परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्कर आणि कुपवाडा पोलीस शोधमोहीम राबवत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पोलीस अधिक्षकांनी केले होते अलर्ट : संरक्षण जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) श्रीनगर यांनी सांगितले की सुरक्षा दलाच्या जवानांना कुपवाडाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी अलर्ट केल्यामुळे ही शोधमोहीम सुरू केली होती. पोलीस अधिक्षकांनी दहशतवादी लॉन्च पॅडपैकी एक नियंत्रण रेषेवरून (LOC) मच्छल सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी कळवल्याची माहिती श्रीनगरच्या संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 1 मे रोजी सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. या भागात सुसज्ज काउंटर फिल्ट्रेशन ग्रिड लावण्यात आला होता. घुसखोरीच्या संभाव्य मार्गांवर भारतीय लष्कर आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) देखील तैनात करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांच्या विरोधात अभियान सुरूच राहील : काश्मीरमध्ये दहशतवादी येऊन येथील नागरिकांना धमकावत आहेत. दहशतवाद्यांच्या या दहशतीमुळे काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. मात्र काश्मीर पोलमीस आणि सुरक्षा दल दहशतवांद्यांचा बिमोड करण्यास कटीबद्ध असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहे.

हेही वाचा - Chhattisgarh Accident : छत्तीसगडमध्ये भीषण अपघात! ट्रकने बोलेरोला धडक दिल्याने 10 प्रवासी ठार

Last Updated : May 4, 2023, 8:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.