रायपूर - छत्तीसगड बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नलक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. यात सीआरपीएफचे पाच जवान हुतात्मा झाले असून 10 जण जखमी झाले आहेत.
सिलगेर जवळच्या जंगलात चकमक झाल्याची माहिती आहे. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली. हुतात्मा जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.
या चकमकीत एका महिला नक्षलवाद्यासह दोन नक्षलवादी ठार झाले. एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. 9 रुग्णवाहिका आणि 2 MI-17 हेलिकॉप्टर्स चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालीयनचे सुमारे 400 जवान नक्षलवादी कारवाईसाठी रवाना झाले होते.
होळीच्या दिवशीही झाली होती चकमक
होळीच्या दिवशी गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तब्बल २५ लाखांचे बक्षीस असणारा कुख्यात नक्षलवादी भास्कर हिचामी ठार झाला होता.
हेही वाचा - Top 10 @ 3 PM : दुपारी तीनच्या ठळक बातम्या!