ETV Bharat / bharat

ED Summons MP Abhishek Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पुतण्याला ईडीची नोटीस

अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी ( West Bengal Coal Scam ) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी ( ED Summons TMC MP Abhishek Banerjee ) आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

ED Summons MP Abhishek Banerjee
ED Summons MP Abhishek Banerjee
author img

By

Published : Mar 17, 2022, 3:06 PM IST

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी ( West Bengal Coal Scam ) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी ( ED Summons TMC MP Abhishek Banerjee ) आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना पुढील आठवड्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी त्यांना संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी दोघांनाही समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर आम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असून आम्हाल दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स जारी करू नये, अशी विनंती त्यांनी ईडीकडे केली होती.

या प्रकरणी बॅनर्जी यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीतील एका एजन्सीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. सीबीआयने आसनसोल आणि त्याच्या लगतच्या ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमधील भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा - Praveen Darekar : दरेकर यांची अटकपूर्व जामीनासाठी धावपळ; मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.