कुपवाडा (जम्मू आणि काश्मीर) : कुपवाडा जिल्ह्यात पोलिसांना अंमली पदार्थांची तस्करी आणि पेडलिंग विरुद्ध मोठे यश मिळाले आहे. (drug smuggling busted in Kupwara). पोलिसांनी कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यातील विविध भागातून पाच पोलीस, एक राजकीय कार्यकर्ते, एक कंत्राटदार आणि एक दुकानदार यांच्यासह 17 जणांना अटक केली आहे. (drug smuggling busted in Kupwara 17 arrested). यात पाकिस्तानमधील अंमली पदार्थ तस्करीचे मॉड्यूल उघडकीस आले आहे. (Drug Smuggling In Kupwara).
तस्करांचा मोठा गट उघडकीस : पोलिसांनी कुपवाडा शहर आणि त्याच्या लगतच्या भागात सक्रिय असलेल्या काही ड्रग्ज तस्करांवर कारवाई केली आहे. पोल्ट्री शॉप मालक मोहम्मद वसीम नजर याला गुप्त माहितीवरून त्याच्या राहत्या घरातून अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात, वसीमने अंमली पदार्थ तस्करांच्या मोठ्या गटाचा भाग असल्याचे कबूल केले. तसेच त्याने बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागातील त्याच्या काही साथीदारांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाभरात विविध ठिकाणी छापे टाकून आणखी 16 जणांना ताब्यात घेतले.
मुजाहिद्दीनच्या सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक : या प्रकरणात मूळचा केरनचा राहणारा पाकिस्तानस्थित दहशतवादी हँडलर शाकीर अली खान हा अंमली पदार्थांचा मुख्य पुरवठादार असल्याचे समोर आले आहे. तहमीदच्या कबुलीजबाब आणि खुलाशावरून त्याच्या घरातून 2 किलो वजनाच्या हेरॉईनसारखी अमली पदार्थाची दोन पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. तहमीद त्याच्या इतर अटक केलेल्या साथीदारांना कुपवाडा येथे ड्रग्स विकून मोठ्या प्रमाणात पैसे कमवायचा. तहमीदचे वडील शाकीर अली खान यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला दहशतवादी गटात सामील होण्यासाठी सर्वप्रथम नियंत्रण रेषा ओलांडली. बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर शाकीरने परत घुसखोरी केली. तो केरन-कुपवाडा सेक्टरमध्ये काही काळ हिजबूल मुजाहिद्दीनच्या सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक होता. त्यानंतर शाकीरने पुन्हा नियंत्रण रेषा ओलांडली आणि पीओकेमध्ये दाखल झाला. आता तो काश्मीर खोऱ्यात, शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि अंमली पदार्थांमध्ये गुंतलेला टॉप दहशतवादी आहे.
ड्रग्जची किंमत 5 कोटी रुपये : या प्रकरणात कुपवाडा पोलीस स्टेशनचे डीवायएसपी खादिम हुसैन यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) तपास करत आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की सुमारे 5 किलो ड्रग्जची किंमत 5 कोटी रुपये आहे. या मॉड्युलचा प्रमुख तहमीद खान याने गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तानातून बाजारपेठेत तस्करी केली होती. या 5 किलो अंमली पदार्थांपैकी सुमारे 2 किलो तात्काळ जप्त करण्यात आले आहे तर सुमारे 1 किलो अंमली पदार्थ तस्कर आणि व्यसनाधीनांकडून जप्त करण्यात आले आहे. 2 किलोचा शोध घेणे बाकी आहे. चालू वर्षात जिल्ह्यात 161 जणांवर 85 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या 33 जणांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.