हैदराबाद : मानसशास्त्रज्ञ सांगतात की, काही मुले त्यांच्या पालकांकडून शिक्षा होत असतानाही चुकीचे वर्तन करणे सोडत नाही. काही पालक आपल्या मुलांना वारंवार सूचना देतात, कधी-कधी त्यांना शिक्षा देखील करतात, तरी देखील मुले योग्य रितीने वागत नाही. मुले आपलं उध्दट वागणे सुरुच ठेवतात आणि परत त्याच त्या चुका करत राहतात.
मार्गदर्शनाची जागी शिक्षा : काही मुले सहसा त्यांच्या वर्गमित्रांशी भांडतात, वर्गातील वस्तू चोरतात, त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्याबद्दल खोटे बोलतात आणि अश्या बऱ्याच गोष्टी करतात की ज्यामुळे पालकांना राग येतो. पालक अनेकदा त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी मार्गदर्शन करतात, एकूणच त्यांना चांगले लोक बनवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मार्गदर्शन मदत करत नाही, तेव्हा काही पालक आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा करतात. काही मुले वर्तमानातील शिक्षा आणि भविष्यात शिक्षा होण्याच्या भीतीने चांगला प्रतिसाद देतात, तर काही बंडखोरी, उदासीनता आणि शेवटी शिक्षेची भीती नसल्यामुळे, मिळालेल्या शिक्षेचा बदला घेतात.
पालकांचे लक्ष वेधून घेतात : मुलांच्या वर्तनावर, ते ज्या वातावरणात वाढले आहे आणि त्यांच्या घरात तसेच त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणाचा, पालकांच्या वागणुकीचा प्रभाव पडतो. मुले घरातील वडीलधाऱ्यांचे निरीक्षण करतात, त्यांच्या पालकांचा एकमेकांशी संवाद आणि ते एकमेकांबद्दलच्या भावना कशा व्यक्त करतात. यावरुन लहान मुलांच्या मनावर उपेक्षित किंवा प्रेम नसल्याचा परिणाम होतो. त्यामुळे ते त्यांच्या पालकांच्या इच्छेनुसार वागण्याऐवजी, ते त्यांच्या इच्छेविरुद्ध वागू लागतात, कारण ते त्यांच्याकडे पालकांचे अधिक लक्ष वेधून घेतात आणि मुलांना असे करणे अधिक योग्य वाटते.
मुलांना विश्वासात घ्या : मानसशास्त्रज्ञ सल्ला देतात की, मुलांवर सकारात्मक मूल्ये बिंबवण्यासाठी, पालकांनी मुलांना शक्य तितका वेळ द्यावा आणि त्यांच्या शाळेबद्दल त्यांच्या मित्रांबद्दल दररोज बोलले पाहिजे. त्यांचे म्हणणे ऐकले पाहीजे, त्यांच्या चिंता काय आहेत, त्यांना कशामुळे आनंद होतो, इत्यादी गोष्टी मुलांना खात्री देतात की, पालकांना त्यांची काळजी आहे आणि ते त्यांच्याकडून चूक झाल्यास किंवा काय करावे हे माहित नसल्यास त्यांची मदत मागू शकतात.
मुलांना आत्म-जागरूक करा : काहीवेळा मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रमाचे पालन करणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे मुलाला शिक्षक आणि सहकारी विद्यार्थ्यांकडून चेष्टेला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांच्या वागण्यातही बदल होऊ शकतो, म्हणून पालकांनी मुलांना त्यांच्या वागण्यामागचे कारण विचारता येण्याइतके सोयीस्कर बनवले पाहिजे. जर पालकांना त्यांच्या कार्यपद्धतीत बदल दिसला, तर त्वरित शिक्षेचा विचार केला जाऊ नये, त्याऐवजी, पालकांनी हळूहळू मुलांना आत्म-जागरूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या भावनांचा सामना करण्यास मदत केली पाहिजे.