स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे, ही एक सामान्य समस्या असली तरी, हेवी वर्क आउट केल्या नंतर सुध्दा स्नायूंमध्ये कमजोरी वाटणं किंवा दुखणं हे त्रास जाणवतात. पण थोड्या आरामानंतर बरं वाटायला लागतं आणि दुखणं थांबतं. पण जर का नेहमीच स्नायू अशक्त झाल्याचं, दुखत असल्याचं जाणवत असेल तर या त्रासांकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं ठरते. यावेळी डॉक्टरांचा इलाज करण्याबरोबर आपण काही काही काळजी घेऊन, घरगुती इलाज सुध्दा सुरु केले पाहीजे. जाणुन घेऊया स्नायूंमध्ये बळकटी आणण्यासाठी (home remedies to strengthen muscles) कोणते घरगुती उपाय करावे ते. Good Health.
1. अंडी खालल्याने स्नायूंना आलेला अशक्तपणा आणि थकवा दूर व्हायला मदत होते. अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, डी, असतात. तसेच फॉलिक एॅसिड, अमिनो फॉलिक एॅसिड, प्रोटीन, योग्य प्रकारचे फॅट्स हे सर्व घटक स्नायूंना पोषणा साठी गरजेचे असतात.
2. चीज आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये असलेले casein protine पचनासाठी जड नसल्याने, स्नायूंच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. चीजमुळे व्हिटॅमिन बी 12 कॅल्शिअम सारखे उपयुक्त अन्न घटक शरीराला मिळतात.
3. आवळ्यात असणारे कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन बी, प्रोटीन स्नायूंच्या बळकटीसाठी उत्तम असतात.
4. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. शरीरात पाण्याची कमतरता असली तरी सुध्दा स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवतो. पाण्याबरोबरच पाण्याचे भरपूर प्रमाण असलेली फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाव्या.
5. नियमितपणे तेलाची मसाज केल्याने, रक्ताभिसरण सुरळीत व्हायला मदत होते. चांगल्या मसाजमुळे तेलातले पोषक तत्व त्वचेमध्ये खोलवर रुजायला व स्नायूंना बळकटी मिळायला मदत होते.
6. याशिवाय स्नायूंच्या बळकटी आणण्यासाठी योगा करणे, चालणे, सायकल चालवणे हे करणे गरजेचे असते. दररोज व्यायाम केल्यास स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते.
वरील गोष्टीं ध्यानात ठेऊन आपल्या आहार - विहाराचे नियोजन केले, तर बळकट स्नायू, सुदृढ शरीर आणि निरामय जीवन तुम्हाला जगता येईल. सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. Good Health.