मुंबई : श्रावन महिन्यात नागपूजा आणि नागपंचमीला (Nagpanchami 2022) नागांना दूध पाजण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. नागपंचमीच्या दिवशी भक्त नाग देवतेची पूजा करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील, शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केल्या जातो. यावेळी नागपंचमीचा सण मंगळवार, २ ऑगस्ट (02 August 2022) रोजी साजरा होणार आहे. नागपंचमीशी संबंधित अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत. त्यानुसार नागपंचमीला काय करु नये. काय केल्यास, अशुभ मानले जाते. चला जाणून घेऊया; अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नागपंचमीच्या दिवशी करू (Do not do this work on Nag Panchami) नयेत.
साप हा आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. सापांच्या अनुपस्थितीत, परिसंस्थेत अनेक बदल घडू शकतात. ज्याचे मानवांवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. हा सण प्रामुख्याने नागांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो.
जिवंत साप किंवा नागाला दूध देऊ नका: नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे. पण जिवंत सापाला दूध देऊ नका. साप हा मांसाहारी प्राणी आहे. हा साप सरपटणाऱ्या प्रजातीचा आहे (सरपटणाऱ्या प्रजाती). सरपटणारे प्राणी दूध तयार करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शरीरात दूध पचवणारे एन्झाइम्स नसतात. साप दूध पचवू शकत नाही. त्यामुळे साप दूध पितो, तेव्हा त्याचा प्रभाव त्याच्या फुफ्फुसावर पडतो आणि संसर्ग सापाच्या शरीरात पसरू लागतो. त्यामुळे काही वेळाने त्याची फुफ्फुस फाटतात आणि सापाचा मृत्यु होतो. त्यामुळे या दिवशी सापाला किंवा नागाला चुकुनही दुध पाजु नये.
नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये : नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे आणि नांगरणी करण्यासही मनाई आहे. कारण बहुतेक साप किंवा सापाचे पिल्लु जमिनीच्या आत राहतात. जमीन खोदल्याने त्यांच्या घरांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागपंचमीला जमीन न खोदण्याची परंपरा सुरू आहे. तसेच, सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जातात. कारण, साप हा शेतातील ऊंदीर खाऊन, शेतातील पिकांचे रक्षण करतो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शेतकऱ्याने शेतात पुजा करावी. त्या दिवशी नांगरणी व खुरपनीचे कुठलेही कार्य करु नये.
तीक्ष्ण वस्तू वापरू नका: मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी चाकू, कात्री या धारदार गोष्टी वापरणे टाळल्या पाहिजेत. कारण असे मानले जाते की, नागपंचमीला तीक्ष्ण वस्तू वापरल्याने अशुभ परिणाम मिळू शकतात.
हेही वाचा : तुम्ही स्वप्नात साप पाहिला... मग या गोष्टी कराच