ETV Bharat / bharat

तामिळनाडूमध्ये सत्तांतर! तब्बल दहा वर्षांनंतर उगवला 'द्रमुक'चा सूर्य!

author img

By

Published : May 3, 2021, 10:08 AM IST

करुणानिधी आणि जयललिता नसल्यामुळे ही निवडणूक स्टॅलिन आणि पलानीसामी यांच्यासाठी एक परीक्षाच होती. या दोन मोठ्या नेत्यांशिवाय त्या-त्या पक्षाचे भविष्य निश्चित करणारी निवडणूक म्हणून या विधानसभेकडे पाहिले जात होते. तामिळनाडूच्या जनतेने आपला कौल स्टॅलिन यांच्या बाजूने देत, करुणानिधींनंतर पक्ष पुढे नेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.

DMK takes over Tamil Nadu's helm after 10 years
तामिळनाडूमध्ये सत्तांतर! तब्बल दहा वर्षांनंतर उगवला 'द्रमुक'चा सूर्य!

चेन्नई : एकीकडे केरळमध्ये सत्ताधारी पक्षाने सत्ता कायम राखून इतिहास रचला. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये द्रमुकने दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुकला घरी बसवून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांचा हा पहिलाच विजय आहे.

निवडणुकीत विजयासाठी ११८ हा जादुई आकडा होता. द्रमुकला तब्बल १५७ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे स्पष्ट बहुमतासह द्रमुक सरकार स्थापन करणार आहे. एम. करुणानिधी यांच्या जाण्यानंतर पहिल्यांदाच द्रमुकने ही निवडणूक जिंकली आहे. करुणानिधी आणि जयललिता नसल्यामुळे ही निवडणूक स्टॅलिन आणि पलानीसामी यांच्यासाठी एक परीक्षाच होती. या दोन मोठ्या नेत्यांशिवाय त्या-त्या पक्षाचे भविष्य निश्चित करणारी निवडणूक म्हणून या विधानसभेकडे पाहिले जात होते. तामिळनाडूच्या जनतेने आपला कौल स्टॅलिन यांच्या बाजूने देत, करुणानिधींनंतर पक्ष पुढे नेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.

उदयानिधीही विजयी, मात्र कमल हासन पराभूत..

स्टॅलिन यांच्यासोबतच त्यांचे पुत्र आणि द्रमुक युवा मोर्चाचे सचिव उदयानिधी स्टॅलिन यांचाही चेपुक-त्रिप्लिकेन मतदारसंघातून विजय झाला आहे. तब्बल ९३ हजारांहून अधिक मताधिक्याने ते निवडून आले. विशेष म्हणजे एवढे मताधिक्य खुद्द एम.के. स्टॅलिन यांनाही मिळाले नाही.

अभिनेता उदयानिधीला या निवडणुकीत यश मिळाले असले, तरी अभिनेत्री खुशबू आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांना पराभव पत्करावा लागला आहे. खुशबू यांना भाजपाने थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून तिकीट दिले होते. त्यांची ही पहिलीच निवडणूक होती. तर दुसरीकडे दक्षिण कोईंबतूरमधून सुपरस्टार कमल हासन निवडणूक लढवत होते. त्यांच्याच एमकेएम पक्षातर्फे ते उभे होते. सुरुवातीच्या कित्येक फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेले हासन यांना शेवटी पराभव पत्करावा लागला.

दिग्गजांनी केलं अभिनंदन..

द्रमुकच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेता रजनीकांत आणि कित्येक नेत्यांनी स्टॅलिन यांचे अभिनंदन केले आहे. सध्या द्रमुकसमोर कोरोना महामारीचे संकट उभे असणार आहे. नवीनच सत्तेत आलेला हा पक्ष कोरोनासह इतर समस्यांना कसा सामोरे जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा : आसाम : आरटीआय कार्यकर्त्याने रचला इतिहास; तुरुंगात राहून जिंकली निवडणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.