नवी दिल्ली/गाझियाबाद Laxmi pooja 2023 : आज दिवाळीत लक्ष्मी-पूजनाचे अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार दिवाळीला प्रत्येक घरात देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. यासोबतच कारखान्यात किंवा दुकानातही लक्ष्मी-गणेशाची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत कधी-कधी पुजेसाठी पुजारी मिळणे थोडे कठीण होऊन बसते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतः लक्ष्मी गणेशाची पूजा करू शकता.
पुजेच साहित्य : ज्योतिषी शिवकुमार शर्मा यांनी सांगितलं की लक्ष्मी गणेशजींच्या पुजेसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यासाठी तांदूळ, कलव, पान, सुपारी, लवंगा, वेलची, अगरबत्ती, फळं, मिठाई, फुलांच्या माळा, आंब्याची पाने, देशी तूप, मोहरीचं तेल, लक्ष्मी गणेशाची मूर्ती, चांदीचं किंवा सोन्याचं नाणं, मातीची भांडी, 11 किंवा 21 दिवे, खीर, बताशा, श्री यंत्र, कुबेर यंत्र, नारळ आणि पंचामृत हे साहित्या पुजेसाठी लागेल.
पुजेची पद्धत : आपले शरीर शुद्ध करण्यासाठी सर्वप्रथम शरीराच्या अवयवांना स्पर्श करा. त्यानंतर आपल्या हातात पाणी आणि फुलं ठेवा. त्यानंतर म्हणा की मी (माझ्या गोत्राचे नाव) गोत्रात जन्मलेल्या (माझं नाव) आज कार्तिक अमावस्या दिवाळीच्या सणावर, आई महालक्ष्मी आणि भगवान गणेशाची आनंदासाठी, घरात सुख-समृद्धी आणि कुटुंबाचं कल्याण व्हावं यासाठी मी पूजा करत आहे. असं म्हणत गणेशाच्या चरणी पाणी आणि फुले सोडावीत.
लक्ष्मीची पुजा केल्यानंतर घंटा आणि शंख वाजवू नका : आरतीनंतर देवी-देवता विश्रांती घेतात, असं मानलं जातं. अशा परिस्थितीत आरतीनंतर शंख आणि घंटा वाजवल्यानं त्यांच्या झोपेत अडथळा निर्माण होतो. म्हणूनच आरतीनंतर कधीही शंख किंवा घंटा वाजवू नये. घंटा वाजवणं म्हणजे घरातून लक्ष्मीला निरोप देणं. आरतीपूर्वीच शंख वाजवावा. एवढेच नाही तर शंख फुंकल्यानंतर तो धुवून मंदिरात ठेवावा.
हेही वाचा :