नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजधानी दिल्लीच्या बाहेरील जिल्हा पोलिसांना एका व्यक्तीने दोनदा फोन करून ही धमकी दिली आहे.
-
Delhi Police's outer district police received two PCR calls today from a man who threatened to kill the Prime Minister, Union Home Minister and Bihar CM; a team deployed to locate the caller, say Delhi Police.
— ANI (@ANI) June 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi Police's outer district police received two PCR calls today from a man who threatened to kill the Prime Minister, Union Home Minister and Bihar CM; a team deployed to locate the caller, say Delhi Police.
— ANI (@ANI) June 21, 2023Delhi Police's outer district police received two PCR calls today from a man who threatened to kill the Prime Minister, Union Home Minister and Bihar CM; a team deployed to locate the caller, say Delhi Police.
— ANI (@ANI) June 21, 2023
पोलिसांनी कॉलरची ओळख पटवली : धमकीचा फोन आल्यानंतर लगेचच तपासासाठी एक पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी कॉल हिस्ट्रीवरून आरोपीची ओळख पटवण्यास सुरुवात केली. आरोपीची ओळख पटली असून, संजय वर्मा असे त्याचे नाव आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, संजय रात्रीपासून दारू पितो आहे. पोलीस आता संजयचा शोध घेत आहेत. तो दिल्लीतील मादीपूर भागातील रहिवासी आहे.
कॉलरच्या शोधासाठी टीम तैनात केली होती : दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या बाह्य जिल्हा पोलिसांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देणारे दोन पीसीआर कॉल आले. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, कॉलरचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली होती आणि त्याची ओळख पटली आहे.
मोदींना या आधीही आली आहे जीवे मारण्याची धमकी : या आधीही पंतप्रधानांसह अनेक बड्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. गेल्या महिन्यातच सहा वर्षांपासून बेरोजगार असलेल्या एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दिल्ली पोलिसांनी आरोपी तरुणाचा कॉल ट्रेस करून त्याला अटक केली. हेमंत असे आरोपीचे नाव असून तो करोलबागचा रहिवासी आहे. पोलीस तपासादरम्यान समोर आले की, आरोपी तरुण नियमित दारू पितो आणि दारुच्या नशेत असे प्रकार करतो.
हे ही वाचा :