ETV Bharat / bharat

Delhi AIIMS FIRE : दिल्ली एम्स रुग्णालयात भीषण आग, रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढले!

दिल्ली एम्स रुग्णालयात आज दुपारी 12 वाजता भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नाही.

Delhi AIIMS
दिल्ली एम्स रुग्णालय आग
author img

By

Published : Aug 7, 2023, 12:49 PM IST

Updated : Aug 7, 2023, 1:27 PM IST

नवी दिल्ली- दिल्ली एम्स रुग्णालयात भीषण आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या जवानाने सहा बंबाच्या मदतीने दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सर्व रुग्णांना सुरक्षितपणे आगीच्या घटनास्थळापासून बाहेर काढण्यात आले आहे.

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात एम्स हे देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयापैकी रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या एंडोस्कोपिक कक्षाला आज सकाळी अचानक आग लागली. आगीची तीव्रता पाहून एम्स प्रशासनाने सर्व रुग्णांना कक्षातून बाहेर काढत सुरक्षितस्थळी नेले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या आगीमुळे चार वर्षापूर्वीची म्हणजे एम्समधील 17 ऑगस्ट 2019 आगीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. तेव्हा आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या ६० बंबची मदत घेण्यात आली होती. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी एनडीआरएफलादेखील पाचारण करण्यात आले होते.

  • #WATCH | Delhi: A fire broke out in the endoscopy room of AIIMS. All people evacuated.

    More than 6 fire tenders sent, say Delhi Fire Service

    Further details are awaited. pic.twitter.com/u8iomkvEpX

    — ANI (@ANI) August 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आगीमुळे लॅबमध्ये नुकसान- भीषण आगीवर नियंत्रण आणण्याकरिता अग्निशमन दलाच्या आज 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. प्राथमिक अंदाजानुसार एंडोस्कोपिक रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. सुदैवाने आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी 12 वाजता दिल्ली एम्समध्ये आग लागल्यानंतर जवळच्या वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. या आगीमुळे लॅबमध्ये नुकसान झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात देशभरातून उपचारासाठी रुग्ण येतात. दररोज सुमारे 12 हजार रुग्ण उपचारासाठी एम्समध्ये येतात. त्यामुळे एम्समध्ये रुग्णांना सेवा देताना प्रशासनावर ताण येतो.

एम्समध्ये डोळ्यांच्या आजारांचे पेशंट वाढले- पावसाळ्यामुळे हवामान बदल असताना दिल्लीत डोळ्यांच्या फ्लूचा धोका सतत वाढत आहे. डोळ्यांच्या फ्लूचे खूप वाढल्याने एम्समधील नेत्र रुग्ण विभागात रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डोळ्यांच्या फ्लूच्या रुग्णांमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ प्रौढच नाही तर लहान मुलांनाही डोळ्यांच्या फ्लूची लागण होत आहे. शाळांमधून मुलांमध्ये हा आजार पसरत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा आजार पसरत असला तरी यंदा अपेक्षेपेक्षा वेगाने पसरत आहे.

Last Updated : Aug 7, 2023, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.