नवी दिल्ली : दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) कॉम्प्युटर सर्व्हरवर चिनी हॅकर्सनी हल्ला केला. (Delhi AIIMS attacked by Chines hackers). वृत्तसंस्था एएनआयने वरिष्ठ सरकारी सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, हॉस्पिटलच्या पाच सर्व्हरचा डेटा यशस्वीरित्या पुन्हा प्राप्त करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबरपासून रुग्णालयातील ऑनलाइन सेवा प्रभावित झाल्या होत्या. (Delhi AIIMS cyber attack).
-
AIIMS Delhi server attack | FIR details that the attack originated from China. Of 100 servers (40 physical & 60 virtual), five physical servers were successfully infiltrated by the hackers. Data in the five servers have been successfully retrieved now: Senior officials from MoHFW
— ANI (@ANI) December 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AIIMS Delhi server attack | FIR details that the attack originated from China. Of 100 servers (40 physical & 60 virtual), five physical servers were successfully infiltrated by the hackers. Data in the five servers have been successfully retrieved now: Senior officials from MoHFW
— ANI (@ANI) December 14, 2022AIIMS Delhi server attack | FIR details that the attack originated from China. Of 100 servers (40 physical & 60 virtual), five physical servers were successfully infiltrated by the hackers. Data in the five servers have been successfully retrieved now: Senior officials from MoHFW
— ANI (@ANI) December 14, 2022
5 सर्व्हर्सवर हल्ला : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (MoHFW) सूत्राने सांगितले की, "एम्स दिल्लीच्या सर्व्हर्सवर चिनी हॅकर्सनी हल्ला केला होता. 100 सर्व्हरपैकी (40 फिजिकल आणि 60 व्हर्च्युअल) पाच फिजिकल सर्व्हरमध्ये हॅकर्सनी घुसखोरी केली होती. मात्र वेळेत ते नियंत्रणात आणले गेले, त्यामुळे जास्त नुकसान झाले नाही. AIIMS दिल्लीने पहिल्यांदा 23 नोव्हेंबर रोजी आपल्या सर्व्हरमध्ये खराबी नोंदवली होती. सर्व्हरची देखरेख करण्याच्या कामावर असलेल्या दोन तज्ञांना सायबर सुरक्षा उल्लंघनाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ई-हॉस्पिटल डेटा पुनर्संचयित करण्यात आला आहे. सेवा पुनर्संचयित करण्यापूर्वी नेटवर्क साफ केले जात आहे. या प्रक्रियेस आणखी थोडा वेळ लागू शकतो. "बाह्यरुग्ण, रूग्ण, प्रयोगशाळा इत्यादींसह सर्व हॉस्पिटल सेवा मॅन्युअल मोडवर चालतात," असे देखील या निवेदनात म्हटले आहे.
हल्ल्याची चौकशी सुरू : या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने एम्स दिल्ली येथील संगणक प्रणालीवर झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरू केली होती. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल फॉरेन्सिक लॅब (CFSL) ची एक टीम मालवेअर हल्ल्याचा स्रोत ओळखण्यासाठी एम्स दिल्लीच्या प्रभावित सर्व्हरची तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती.