तिरुपती - तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने 8 महिन्यांनंतर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी, 10 वर्षांखालील मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी 'दर्शन' पुन्हा सुरू केले आहे. सध्याच्या कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर या लोकांसाठी दर्शन बंद होते. आता ते पुन्हा खुले केले आहे. मात्र, दर्शनासाठी ठरविलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
हेही वाचा - पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अनुकूल करणे : मूल्यांकन पीएमएफबीवायचे
मंदिराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'टीटीडीने भाविकांसाठी श्रीवारी दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्याच वेळी कोविड - 19 साठीची मार्गदर्शक तत्त्वे आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे लागेल.'
मंदिर व्यवस्थापनाने 20 मार्चपासून तिरुपती मंदिरातील 'दर्शन' बंद केले होते. जून महिन्यात ते अनलॉकचा भाग म्हणून ते पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र, तेव्हा आरोग्याच्या खबरदारीच्या कारणावरून वयस्कर, लहान मुले आणि गर्भवती भाविकांना वगळण्यात आले होते.
हेही वाचा - कोरोना काळात भारतातील स्थलांतरित लोकांच्या समस्या