मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात अब्जावधींचा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ०९ हजार २३७ रुपये इतकी आहे.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार ६०० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख ०९ हजार २३७ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १२६ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ३९ हजार ७३१ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.३७ रुपये इतका आहे.
हेही वाचा : TODAYS PETROL DIESEL RATES : पेट्रोल - डिझेलची दरवाढ सुरूच.. पहा महाराष्ट्रातील आजचे दर