मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर आज काही प्रमाणात बिटकॉइनची किंमत वाढली आहे. गेल्या चार दिवसात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. त्यात थोडी सुधारणा होऊन आता बिटकॉइनच्या किमतीत ८ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ९७ हजार १५६ रुपये इतकी आहे.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार ४७४ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १५ लाख ९७ हजार १५६ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार २३९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ७६ हजार २२९ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०५६ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.३४ रुपये इतका आहे.
हेही वाचा : Todays Gold Rates : सोन्याचे भाव वाढले.. चांदीही चकाकली.. पहा आजचे देशभरातील दर